Breaking

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

*शिवाजी विद्यापीठात बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी*


बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना कुलगुरू डॉ. डी. टी शिर्के,प्र. कुलसचिव डॉ.विलास शिंदे व अन्य मान्यवर


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर  : दि. १५ नोव्हेंबर, २०२२ रोजी शिवाजी विद्यापीठामध्ये बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांच्या हस्ते विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी  मा.कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आपल्या मनोगतातून बिरसा मुंडा यांच्या कार्याला व विचारांना उजाळा दिला.

        यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, भूगोलाशास्त्र विभागातील प्रा. डॉ. जगदीश सपकाळे, इतिहास अधिविभागातील सहा. प्रा.दत्तात्रय मचाले, तसेच छ. शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप,संतोष वंगार व इतर प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा