Breaking

बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

*जयसिंगपूरच्या डॉ.जे.जे.मगदूम अभियांत्रिकीच्या सिव्हील विभागातील विद्यार्थ्यांची कोअर कंपन्यांसह आय.टी. क्षेत्रात निवड*


डॉ. जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, जयसिंगपूर

*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*


 जयसिंगपूर - येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची नोकरीसाठी कोअर कंपन्यांसह आय.टी. क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये झाली अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्र. प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली.

       औद्योगिक जगतात आय.टी. चा वाढता वापर व त्या अनुषंगाने उपलब्ध असणाऱ्या अधिक नोकरीच्या संधी लक्षात घेऊन डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयाने या क्षेत्रातील संबंधीत विविध संस्थांशी सामंजस्य करार करून सिव्हिल शाखेतील विदयार्थ्याना संबंधित सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कंपन्यांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांना सॉफ्टस्कील तसेच विविध सॉफवेअर संबंधीत प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य विकसित केले जाते, अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.पी.पी. माळगे यांनी दिली.

   महाविद्यालयातील सिव्हिल विभागाच्या २३ विद्यार्थ्यांची विप्रो १ , एल अँड टी १ , कॅप जेमिनी ०३, इन्फोसिस ०३, टी सी एस १, क्यू स्पायडर ०१, कॉन्फर १ ,  वरद कॅपिटल ०५, जे.जे.रिलाझ ०५, इंडोवन्स ०५, ट्रेकनोकॉम  ०१ या जागतिक पातळीवर नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. 

     या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व व्हा.चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम यांनी केले.

 ‘युवर ड्रीम अवर व्हिजन’ या संस्थेच्या टॅगलाईनुसार सर्व शाखातील विद्यार्थ्यांना शासकीय व औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे, त्यामुळे कंप्यूटर आयटी विभागामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी निराश होण्याची गरज नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा