![]() |
कोल्हापुरात स्मृती स्तंभाला मानवंदना देताना |
टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे
कोल्हापूर : दुसरे महायुद्ध (1939-45) जर्मन रशिया देशांनी पोलंडवर जबरदस्त हल्ला केला होता. छत्रपती राजाराम महाराज यांनी वळवडे येथे 250 एकर जागेमध्ये 5000 जणांना स्थायिक केले होते. ते आजचे गांधीनगर आहे.
माननीय कोल्हापूर जिल्हाधिकारी माननीय आयुक्त महानगरपालिका यांच्या सहकार्याने भगवान महावीर गार्डन या ठिकाणी शहीद सैनिकासाठी व पोलंड वासिया साठी मूर्ती स्तंभ उभा केला.
सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष कर्नल विजय गायकवाड व संचालक मंडळ यांनी पुढाकार घेऊन हे कार्य पुढे येऊन जाण्यास मदत केली.कौन्सिल जनरल ऑफ पोलंड येथून मा.दामियन इरसिक, सौ जोअण्णा इरसिक, यांनी पुष्पचक्र वाहिले .
संस्थापक अध्यक्ष एन. एन. पाटील यांनी सैनिक असोसिएशन बाबत थोडक्यात माहिती सांगितली .
स्तंभाचे रचनाकार बिल्डर ओसवाल अशोक काशीकर (मूळ पोलंड) उद्योगपती दीपक सुभे, एन. एन .पाटील ,उपाध्यक्ष सुभेदार बी .जी.पाटील, सचिन हवालदार, मारुती मनमाळे, हवालदार संभाजी माने ,हवालदार शिवाजी सरनाईक ,भीमसेन नाईक ,यांच्या उपस्थितीत शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा