![]() |
कोथळी गावची कन्या व जयसिंगपूर कॉलेजची विद्यार्थिनी कु.श्रुती दत्तात्रय यादव ( बी.एस्सी.-३ पदार्थविज्ञान) |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : गुजरात येथे होणाऱ्या एन.एन.एस च्या प्री-आर.डी. कॅम्प साठी शिवाजी विद्यापीठातून पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कोथळी गावची कन्या व जयसिंगपूर कॉलेजची विद्यार्थिनी कु.श्रुती दत्तात्रय यादव हिची निवड झाली आहे.
प्री-आरडी कॅम्पसाठी राज्याचे निवड चाचणी शिबिराचे यजमानपद शिवाजी विद्यापीठाला मिळाले होते. सदर शिबिरा साठी महाराष्ट्रातील २९ विद्यापीठातील ३१० एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या या राष्ट्रीय निवड चाचणी मधून ५६ विद्यार्थ्यांची निवड करावयाची होती. यामध्ये विद्यार्थ्यांचा फिटनेस, टर्न आउट, ड्रिल मार्चिंग,वर्ड ऑफ कमांड व सांस्कृतिक कला या सर्व कडक निकषाच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या विविध निकष व काठीण्य पातळीवर चाललेल्या निवड शिबिरात महाराष्ट्रातील (शिवाजी विद्यापीठ) कु,श्रुती दत्तात्रय यादव (जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर) , श्री.अभिषेक रामचंद्र पावले (देशभक्त ए.डी.नाईक कॉलेज, चिखली), श्री.ओंकार भारत घडेकरी( देवचंद कॉलेज, निपाणी), श्री.श्लोक उदयकुमार वरुदे (बळवंत कॉलेज, विटा)व कु. करीना राजमहंमद जमादार (दूधसागर महाविद्यालय, बिद्री) या पाच विद्यार्थ्यांची गुजरात येथे होणाऱ्या वेस्ट झोनकडे ( प्रजासत्ताक दिन संचलन) प्री-आरडी कॅम्प साठी निवड झाली आहे.
सदरचा वेस्टर्न झोन प्री-आरडी कॅम्प २० नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर,२०२२ या कालावधीत सरदार पटेल युनिव्हर्सिटी वल्लभ विद्यानगर जि. आनंद( गुजरात) या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये वेस्टर्न झोन क्षेत्रातील आंध्रप्रदेश,तेलंगणा, गुजरात, दिव दमण, दादरा नगर हवेली, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचा समावेश होतो. सदर राज्यातून २०० NSS स्वयंसेवक विद्यार्थी व १० कार्यक्रम अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे पाच विद्यार्थी व श्री.अण्णासाहेब डांगे आर्ट्स कॉमर्स कॉलेज, हातकणंगलेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सौ.सुनिता तेलसिंगे यांची निवड झाली आहे.
सदरच्या निवडीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी.शिर्के, प्र.कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विलास शिंदे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. तसेच शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे कार्यक्षम संचालक प्रा.अभय जायभाये यांच्या नेतृत्वाखाली या पाच एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थ्याची निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांच्या निवडीने एन एस एस विभागाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अभिनंदन सर
उत्तर द्याहटवा