![]() |
महिला हाफ पिच क्रिकेट स्पर्धा |
*सौ.गीता माने : सह-संपादक*
जयसिंगपूर : अष्टविनायक तरुण मंडळ शाहूनगर, जयसिंगपूर यांनी स्वर्गीय संजय पाटील यांचे स्मरणार्थ हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या महिलांनी सामना पाहून उत्स्फूर्तपणे महिलांच्या करिता विशेष हाफ पिच स्पर्धाचे आयोजन करण्याबाबतची विनंती या मंडळाला केली. या महिलांच्या विनंतीला मान देत अष्टविनायक तरुण मंडळाच्या संयोजकांनी सदर महिलांसाठी स्पर्धेचे आयोजन केले.
सदर महिलांचा क्रिकेट सामना पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गाची चांगलीच गर्दी जमली होती.महिलांनी या क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवत या स्पर्धेत चांगलीच वातावरण निर्मिती केली. महिला खेळाडूंचा मैत्रीपूर्ण सामना अत्यंत रंगतदार व चुरशीचा सामना पाहायला मिळाला. उपस्थित प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद लुटला. दरवर्षी महिला खेळाडूंच्या साठी हाफ पीच सामना आयोजन करण्याबाबत महिलांनी आवाहन केले. सदर अष्टविनायक तरुण मंडळाच्या संयोजकांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली.
या स्पर्धेत डॉ.सुनेत्रा किरण पाटील यांनी नाणेफेक केली.स्पर्धेचे नियोजन महिला मंडळाच्या प्रमुख सौ.माधवी डोंगरे,सौ.शुभांगी जाधव,सौ.सविता पवार,सौ. सपना शहा,सौ.प्रणाली कदम आदींनी केले होते.
सदर विशेष महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजनासाठी अष्टविनायक तरुण मंडळाचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा