Breaking

शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

*अतितटीच्या अंतिम सामन्यात सनी सुतार फायर्टसने कोथळीकर डायनामिक्सला केले पराभूत*


अंतिम सामना जिंकल्यानंतर विजेती व उपविजेत्या टीमने केला जल्लोष


*प्रा. डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूरात : अष्टविनायक प्रिमिअर लिग,२०२२ चे बुधवार २८ डिसेंबर पासून ते शुक्रवार ३० डिसेंबर,२०२२ या तीन दिवशी हाफ पीच क्रिकेट सामना संपन्न झाला.काल पार पडलेल्या अतितटीच्या अंतिम सामन्यात सनी सुतार फायर्टसने(सनी सुतार )टीम कोथळीकर डायनामिक्सला (संजय पाटील- कोथळीकर) पराभूत करीत हा सामना जिंकला.

     सनी सुतार फायर्टस या टीमचे प्रायोजक सनी सुतार,विजेत्या टीमचे कप्तान अमित वायचळ व विजेत्या टीमच्या सर्व खेळाडूंना (स्वर्गीय संजय पाटील चषक) जयसिंगपूरचे सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील-कोथळीकर, मुरगुंडे मॅडम (आऊ), सचिन डोंगरे या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून विजयी जल्लोष केला.अत्यंत आनंदी व जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

      अष्टविनायक प्रिमिअर लिग,२०२२ चे वैशिष्ट्य म्हणजे सुरू असलेला पुरुष सामना पाहून व प्रेरित होऊन या मंडळातील तरुण महिलांनी व लहान मुलांनी मैत्रीपूर्ण सामना खेळला. या सामन्यासाठी पंच म्हणून सुनील सुतार व शिंगाडे यांनी काम पाहिले. मराठी समालोचक म्हणून सागर खिचडे व इंग्रजी समालोचक म्हणून प्रा. बाळगोंडा पाटील यांनी सामन्यातील नेमकेपणाने उत्तम समालोचन केले.

    सदरच्या अष्टविनायक प्रीमियर लीग मध्ये टीम देशिंगेकर, कोथळीकर डायनामिक्स, मुरगुंडे वॉरियर्स, सनी सुतार फायटर्स, एस वि चॅलेंजर्स आणि डोंगरे सुपर किंग्स या अनुभवी व उत्साही टीमच्या माध्यमातून हे  सामना मोठ्या आनंदाने व खिलाडूवृत्तीने संपन्न झाला.

     या सामन्याच्या दिमाखदार सोहळ्या प्रसंगी सचिन डोंगरे,अमोल देशिंगकर, सनी सुतार, समर पाटील, विशाल पवार, प्रा.बाळासाहेब पाटील, शुभम वाडदेकर, अण्णा कोरे,निखिल कुंभार आणि प्रा. डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते. हा अंतिम सामना पाहण्यासाठी महिलांच्या बरोबर क्रिकेट शौकिनानी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

     अंतिम सामन्याच्या समापन सोहळ्याचे उत्तम सूत्रसंचालन सचिन डोंगरे यांनी केले.

     अष्टविनायक प्रीमियर लीग,२०२२ चे उत्तम आयोजन अष्टविनायक तरुण मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले. यासाठी विश्वजीत (गोटू) पाटील, सागर पाटील, संदीप जाधव व  मंडळाच्या अन्य सदस्यांनी महत्त्वाची यशस्वी कामगिरी बजावली.

     अष्टविनायक तरुण मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलता जपत सातत्याने हे मंडळ कार्यरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा