Breaking

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

*जयसिंगपूरच्या कन्या महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन!*


डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त घोडावत कन्या कॉलेजमध्ये अभिवादन


*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष  प्रतिनिधी*


जयसिंगपूर : लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना व सर्व विभागाच्या वतीने संविधानाचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि. ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त  पोस्टर प्रदर्शन व  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा.डॉ. धनंजय कर्णिक  समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.

     कन्या माविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मार्गदर्शन करताना म्हणाले, संशोधक, पत्रकार, लेखक, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, दलित व महिला अधिकाराचे उद्घारक म्हणून त्यांचा गौरव केला. याचबरोबर पाली, संस्कृत व हिंदी साहित्याचे अभ्यासक, देशातील पहिले कामगारमंत्री, विज्ञानवादी, शेतकरी व गोरगरीब कामगाराचे खरे हितकर्ते म्हणून त्यांच्या कार्यकतृत्वाचे  गौरवास्पद विचार मांडले.

    कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व समन्वयक प्रा. डॉ. गौतम ढाले यांनी केले.आभार श्री. उत्तम तिवडे यांनी मानले. यावेळी ज्युनि. विभागप्रमुख श्री. सलिम मुजावर, प्रा. डॉ. सौ. एम. आर. शिंदे , प्रा. जी. एस. गवस उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा