![]() |
मा.सी.व्ही. कुलकर्णी मार्गदर्शन करताना |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर अर्थशास्त्र विभागाच्या बी.ए. व एम.ए अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांकरीता अभ्यासक्रमाचा भाग व बदलत्या जागतिक व्यावसायिक परिस्थितीचा विचार करून भिलवडीच्या चितळे दुग्ध संस्थेत अभ्यास क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीस पीआरओ मा.व्ही. सी.कुलकर्णी यांनी दुग्ध संस्थेची प्राथमिक माहिती देऊन त्यांनी दुग्ध पॅकेजिंग युनिटला भेट देण्यास सहकार्य केले. या अभ्यास क्षेत्र भेटी दरम्यान गुरुदास पाटील यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन प्रक्रिया ते विपणन पर्यंतचा प्रवासाबाबतची माहिती दिली.
यानंतर पीआरओ मा.श्री.व्ही. सी.कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करून चितळे ग्रुपच्या स्थापनेपासून ते आजतागायत दुग्धजन्य व्यवसायाच्या संदर्भातची इतिहास वजा माहिती LCD प्रोजेक्टवर दिली. चितळे समूहाने आधुनिकतेची कास धरून नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर आपल्या चविष्ट व गुणवत्तापूर्ण उत्पादनाची निर्मिती केली.तसेच चितळे समूहाने गावातील प्रत्येक शेतकरी व पशुपालकांशी संपर्क ठेवून दुग्ध उत्पादनवाढ, पशुचिकित्सा,पशुखाद्य व व्यवसायातील बदलते प्रवाह या अनुषंगाने त्यांना अपडेट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच चितळे समूहाने पशु काल पशुपालकांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीच्या वाटचालीत खूप मोठी मदत केली आहे.
श्री. कुलकर्णी यांनी मार्केटिंग संदर्भातील विदेशातील त्यांचा अनुभव कथन करून सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
या अभ्यास क्षेत्र भेटीच्या माध्यमातून अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना लाभ झाला. यामध्ये प्रा.डॉ. प्रभाकर माने व प्रा. कु. माधुरी कोळी व २२ विद्यार्थी सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा