Breaking

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२

*डॉ. आंबेडकरांनी बुद्धांचा मानवतावादी विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला : डॉ. डी.जी.चिघळीकर*


डॉ.डी.जी.चिघळीकर मार्गदर्शन करताना


*प्रा. डॉ. प्रभाकर माने  : मुख्य संपादक*


कागल : ६ डिसेंबर २०२२ रोजी इतिहास विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त "डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार" याविषयावर डॉ.डी. जी.  चिघळीकर यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

   यावेळी डॉ. चिघळीकर बोलताना ते म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांचा मानवतावादी विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. बुध्द,कबीर आणि फुले हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू होते. आपल्या राज्यघटनेची जी उद्देशिका आहे यातून आपल्या राज्यघटनेचे प्रतिबिंब स्पष्ट होते. आपल्या देशाची राज्यघटना ही  देशातील सबंध मानवजातीला अधिकार आणि संरक्षण प्राप्त करते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून ही राज्यघटना तयार करून आपल्या हाती सुपूर्द केली. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना अधिकार दिले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या समाजाला हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी महाडचा सत्याग्रह व नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह केला. या त्यांच्या कार्यामुळे ते खरोखरच Nation Builder, होते. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. अशा या महापुरुषाची प्राणज्योत ६ डिसेंबर १९५६ रोजी मालवली. असा महापुरुष आपल्या भूमित जन्माला आला हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. म्हणून आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान वाचविणे ही काळाची गरज आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ओळख इतिहास विभाग प्रमुख  प्रा.डॉ. संतोष जेठिथोर यांनी केले.

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.प्रवीण चौगले यांनी भूषविले व कार्यक्रमाचे आभार डॉ.आदिनाथ गाडे यांनी मानले आणि सुत्रसंचालन डॉ. सुशिलेंद्र मांजरडेकर यांनी केले यावेळी उपस्थित डॉ. लखन भोगम, प्रा. निशांत खाबडे, प्रा. विनायक जाधव माळी, प्रा.कल्पना गुरव, प्रा. लतिका सावेकर शाहू ऐवाळे व महाविद्यालयातील विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा