![]() |
अष्टविनायक प्रीमियर लीग, 2022 उद्घाटन प्रसंगी |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूरात अष्टविनायक प्रिमिअर लिग,२०२२ ला उत्साहात सुरुवात झाली असून आज जयसिंगपूर चे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मा. संजय पाटील-कोथळीकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी दिलीप देशिंगकर व सुरेश शहा हे मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मा. संजय पाटील-कोथळीकर म्हणाले, अष्टविनायक तरुण मंडळ नेहमीच सामाजिक कार्याबरोबर राष्ट्रीय कार्यात सातत्याने अग्रेसर असते. कला क्रीडा व सांस्कृतिक या क्षेत्रात या तरुण मंडळाने भरीव कामगिरी केली आहे.
याप्रसंगी मा.दिलीप देशिंगकर म्हणाले, ही स्पर्धा आनंदासाठी आणि खिलाडी वृत्ती निर्माण होण्यासाठी आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमुळे सदर भागातील तरुणाई चार तास मोबाईल पासून दूर राहणार आहे हे सर्वात कौतुकास्पद असल्याबाबत त्यांनी उद्गार काढले.
दोन वर्षांपूर्वी या तरुण मंडळांचे कार्यशील कार्यकर्ते स्वर्गीय संजय पाटील यांचा अचानक मृत्यू झाल्याने मंडळात कार्याची पोकळी निर्माण झाली होती. परंतु मंडळातील सर्व सक्रिय तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या या तरुण मित्राची आठवण सातत्याने आपल्यासमोर राहावी यासाठी त्यांच्या नावे स्वर्गीय संजय पाटील स्मृती चषक सुरू केला. आज या मंडळाने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त अष्टविनायक प्रीमियर लीग, २०२२ ची अत्यंत थाटामाटात व उत्साहात सुरुवात केली. यामध्ये टीम देशिंगेकर, कोथळीकर डायनामिक्स, मुरगुंडे वॉरियर्स, सनी सुतार फायटर्स, एस वि चॅलेंजर्स आणि डोंगरे सुपर किंग्स या अनुभवी व उत्साही टीमच्या माध्यमातून हे अष्टविनायक प्रीमियर लीगचा सामना मोठ्या आनंदाने व खिलाडूवृत्तीने संपन्न होत आहे.
या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सचिन डोंगरे,अमोल देशिंगकर, सनी सुतार, समर पाटील, विशाल पवार प्रा.बाळासाहेब पाटील, शुभम वाडदेकर, अण्णा कोरे,निखिल कुंभार व प्रा. डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते. याप्रसंगी शेकडो क्रिकेट शौकीन हा सामना पाहण्यासाठी उपस्थिती लावली होती.
या अष्टविनायक प्रिमिअर लिग 2022 च्या आयोजनामध्ये विश्वजीत पाटील, सागर पाटील ,संदीप जाधव व मंडळाचे असंख्य कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आहे.
या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब पाटील यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा