Breaking

मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

*कोथळी येथे नाताळ निमित्त मातोश्री सोशल फाउंडेशनच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न*


कोथळी येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

*प्रा. मेहबूब मुजावर :  विशेष प्रतिनिधी*


कोथळी  : मातोश्री सोशल फाउंडेशन कडून नाताळ निमित्य भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आर्मी भरती व पोलीस भरती सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी भव्य अशा १६०० मीटर अंतरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

     १६०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिरदवाडचा ओंकार कुंभार, द्वितीय क्रमांक अनिश ठोंबरे (नॅशनल स्पोर्टस उमळवाड) तृतीय क्रमांक अनिकेत माने इचलकरंजी व  चतुर्थ क्रमांक शैलेश कार्वेकर दानोळी, वरद सांदले तमदळगे  या स्पर्धकांनी सुयश संपादन केले आहे.  

        सदरच्या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ भारतीय सेनाचे जवान मा.श्री अविनाश बिरंगे यांच्या हस्ते स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जवान अविनाश बिरंगे यांनी मातोश्री सोशल फाउंडेशने आयोजित केलेल्या स्पर्धेचे कौतुक केले. तसेच भरतीसाठी तयारी करणाऱ्या कष्टाळू व मेहनती विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन केलेबाबत आभार व्यक्त केले. तसेच मातोश्री सोशल फाऊंडेशन ही सेवाभावी वृत्तीने उत्तम कामगिरी करणारी संस्था असल्याचे उदगार त्यांनी काढून इथून पुढे असेच समाजहिताचे कार्य करावे अशा शुभेच्छा ही संस्थेस दिल्या.

      यावेळी शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे सचिव मा.श्री शशिकांत घाटगे यांनी मातोश्री सोशल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करीत हे फाउंडेशन सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी संस्था असल्याचे उद्गार त्यांनी काढून त्यांनी मातोश्री संस्थेच्या कार्य उल्लेखनीय प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले व मातोश्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन आवळे यांना असेच समाज हितासाठी कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या.

       सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य नितीन वायदंडे सदस्य, लखन कांबळे, मातोश्री सोशल फाउंडेशनचे सचिव सुशांत चुडाप्पा सामाजिक कार्यकर्ते  दादा तिवडे लाजारस तिवडे  सुनील आवळे संदीप मोरे शहाजी बिरंगे मोहन तिवडे, आकाश घोलप प्रकाश घोलप   सागर तिवडे संदीप कांबळे यासह  क्रीडा शौकीन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   सदर स्पर्धेच्या आयोजनाबाबत क्रीडाप्रेमी व गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा