*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सांगली : यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यात हरिणीचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र बुधवार पर्यंत उलगडा झाला नाही. अन्नाच्या शोधासाठी कदाचित बाहेर पडणाऱ्या प्राण्यांच्यावर मोकाट कुत्र्यांचा हल्लाही होत असतो.
वनाधिकारी व वन विभागाकडून सागरेश्वर अभयारण्यातील वन प्राण्यांचे डोळ्यात तेल घालून संरक्षण केलं जात असल्याचे बोलले जाते.मात्र प्रत्यक्षात नोकरीतील कामाचा भाग म्हणून येथे सेवा बजावत असल्याने अभयारण्यातील वन्य प्राण्यांच्या कडे दुर्लक्ष होत असल्याबाबत येथील शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. जबाबदार घटकांच्या कडून सुरक्षा बाबत विचारणा केली असता आमच्याकडून अभयारण्याच्या सुरक्षेसाठी आम्ही सक्षम आहोत. प्रत्यक्षात मात्र हा फार्स आहे की काय अशी शंका निर्माण होते.
वनविभागाने हे प्रकरण गांभीर्याने लक्षात घेऊन पुन्हा अशा घटना घडू नयेत. तसेच या घटनेच्या पाठीमागे काय असावं याचा शोध घ्यायला हवा, अशा अपेक्षा प्राणीमित्र व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा