![]() |
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर |
*सौ.गीता माने : सहसंपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत २ जानेवारी, २०२३ पासून सुरु होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्यापासून बेमुदत ठिया आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.
शिवाजी विद्यापीठात अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांचे प्रवेश हे सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात झालेले आहेत. तरी शिवाजी विद्यापीठाची विभागाच्या परीक्षा सोमवार दिनांक 2/1/2023 पासून सुरु होत आहेत. यूजीसीच्या नियमानुसार प्रवेश झाल्यापासून 90 दिवस सुट्ट्या सोडून शिकवणी वर्ग पूर्ण झालेले नाहीत.
या कारणामुळे सोमवारपासून सुरु होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेत तात्पुरती स्थगिती मिळणेबाबत ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात व्हावी जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईल व अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना वेळ मिळेल. या मागणीसाठी उद्या दिनांक - ३०/१२/२०२२ रोजी विद्यापीठ परिसरातील मुख्य गेट समोर सकाळी ११.०० वाजल्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे माहिती आंदोलक विद्यार्थ्यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा