Breaking

बुधवार, १८ जानेवारी, २०२३

*जयसिंगपूरचा कु.रुद्र संदेश श्रावस्ती' सेलेस्टीअल ब्युटी आणि हिरोइक मॅन ऑफ भारत २०२३ या सौंदर्य स्पर्धेत ठरला उपविजेता*


जयसिंगपूरचा कु.रुद्र संदेश श्रीवस्ती (उपविजेता)


*प्रा.डॉ.मनोहर कोरे : उपसंपादक*


कोल्हापूर : देशपातळीवर पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या 'सेलेस्टीअल  ब्युटी आणि हिरोइक  मॅन ऑफ भारत २०२३ या सौंदर्य स्पर्धेत कुमार रुद्र संदेश श्रावस्ती कोल्हापूर (महाराष्ट्र) हा उपविजेता ठरला आहे. कोल्हापुरातील सयाजी हॉटेल मध्ये ९ जानेवारीला ही स्पर्धा झाली. देशभरातील मिस्टर, मिस व मिसेस या कॅटेगिरीमधून ३६ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

      रुद्रने यापूर्वी घेण्यात आलेल्या 'ग्ल्यमेटोर मिस्टर, मिस व मिसेस महाराष्ट्र २०२२' या स्पर्धेत मिस्टर 'ग्ल्ॉमेटोर किंग ऑफ कोल्हापूर २०२२ चा विजेता ठरला आहे. देशपातळीवर घेण्यात आलेल्या ऑडिशनमधून तो 'सेलेस्टीअल ब्युटी आणि हिरोइक मॅन ऑफ भारत २०२३' या देशपातळीवरील स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. टॅलेंट राऊंड, इंट्रॉडक्शन व प्रश्नोत्तरे असे तीन राऊंड घेण्यात आले. यामध्ये रुद्रने यश संपादन करत उपविजेते पद पटकावले. तसेच तो मिस्टर 'ग्ल्यामरस लूक स्पर्धक ही ठरला. देशपातळीवरील ही सौंदर्य स्पर्धा पहिल्यांदाच कोल्हापूरात संजय घोडावत ग्रुप, माणिकचंद व सयाजी यांनी प्रायोजित केली होती. तर 'सेलेस्टीअल ब्युटी आणि हिरोइक मॅन ऑफ भारत २०२३' गौरा फॅशन क्लबच्या गौरी नाईक या स्पर्धेच्या आयोजक होत्या. 

      रुद्र हा इंटेरिअर डिझाइनर असून तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी करत आहे. या यशामध्ये रुद्र श्रावस्तीची आई शरयू, वडील संदेश, भाऊ शुभम वाहिनी शार्वी, सर्व नातेवाईक व अरबाज मुल्लाणी यांचे प्रोत्साहन लाभले. या स्पर्धेसाठी मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील  कलाकार मिलिंद गुणाजी व रजनीश दुग्गल हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा