Breaking

गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

*जागतिक श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खान चौथ्या स्थानी*


Source: Wikipedia 


मुंबई : जगातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत बॉलिवूडचा बादशहा किंग खान शाहरुख खान चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत शाहरुख खान हा एकमेव भारतीय अभिनेता आहे.

   'वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक'ने ही यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. हॉलिवूड अभिनेता जेरी सेनफेल्ड हा अभिनेता पहिल्या क्रमांकावर आहे. टॉम क्रूझ आणि जॅकी चॅन या दिग्गज अभिनेत्यांना मागे टाकून शाहरुखने यादीत चौथे स्थान पटकाविले आहे. बहुचर्चित 'पठाण' चित्रपटाची प्रतीक्षा असताना जगातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत समावेश आहे. त्याची संपत्ती जवळपास ७७ कोटी डॉलर इतकी असून त्याची व्यावसायिक  गुंतवणूक मनोरंजन क्रीडाक्षेत्र व्ही.एफ.एक्स. आणि इतर क्षेत्रात आहे. या यादीत जेरी सेनफेल्ड १ अब्ज डॉलर, टेलर पेरी एक अब्ज डॉलर, इव्हेन जॉन्सन ८० कोटी डॉलर, टॉम क्रूज ६२ कोटी डॉलर, जॅकी चॅन ५२ कोटी डॉलरसह सहाव्या स्थानी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा