![]() |
निमशिरगाव येथे रत्नाप्पाण्णा कुंभार यांना श्रद्धांजली वाहताना |
*प्रा. डॉ. नंदकुमार कुंभार : विशेष प्रतिनिधी*
निमशिरगाव : देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या जन्मगावी निमशिरगाव तालुका शिरोळ येथे काल रत्नाप्पाण्णा कुंभार अर्थात अण्णा प्रेमी घटकांची बैठक महादेव मंदिर सभागृहात भरली होती. त्याला विविध क्षेत्रातले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रारंभी सौं. रजनीताई मगदूम यांनी प्रतिमा पूजन केले. डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती देताना सांगितले की " भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये श्री रत्नाप्पा कुंभार यांचा सहभाग होता आणि घटनेवर अण्णांची स्वाक्षरी आहे. त्यांनी केलेले स्वातंत्र्य चळवळीतील काम अविस्मरणीय असून स्वातंत्र्यानंतर सुद्धा साखर कारखाना ,सूतगिरणी सारखी सहकारी चळवळ त्यांनी निर्माण केली .लॉ कॉलेज, कॉमर्स कॉलेज , हायस्कूल ,नाईट कॉलेज यासारखी शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे काम ही उल्लेखनीय आहे. आज महाराष्ट्रातील अनेक नामवंत न्यायाधीश या लॉ कॉलेजचे विद्यार्थी असून गेल्याच आठवड्यात सर्वजण लॉ कॉलेजमध्ये एकत्र आले होते.
अशा थोर स्वातंत्र्य सेनानीचे स्मारक दुर्लक्षित असून ते त्यांच्या जन्म गावी व्हावे अशी कुटुंबीयांची इच्छा आहे.त्यासाठी आम्ही जागेची व्यवस्था केली असून 25 लाख रुपये देणगी जाहीर कली. दे.रत्नाप्पा कुंभार मागासवर्गीय सूतगिरणीचे चेअरमन अशोक माने यांनी पाच लाखाची देणगी जाहीर केली.
या सभेला पुंडलिक जाधव,राजवर्धन नाईक निंबाळकर, पद्माकर पाटील डॉ. राजेंद्र कुंभार ,डॉ. प्रकाश कुंभार, आर्किटेक कणद कुंभार , रमेश चौगुले , बाबगोडा पाटील, शोभा कोळी, पै. अमृता भोसले बाळासाहेब पाटील, उदय गीते स्वामी सर, प्रा. डॉ. नंदकुमार कुंभार, स्वस्तिक पाटील, निमशिरगावच्या सरपंच अश्विनी गुरव व सर्व सदस्य, शिवाजी कांबळे, विनोद पुजारी व अनेक आण्णाप्रेमी मान्यवर उपस्थित होते.
माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी रत्नाप्पाण्णांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. कनाद कुंभार यांनी हा प्रकल्प कशा रीतीने साकारेल हे स्लाईडसद्वारे दाखवले.याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी हा प्रकल्प साकारावा म्हणून देणग्या जाहीर केल्या. हा प्रकल्प येत्या तीन वर्षांमध्ये साकारला जाणार असून संविधानाची 75 वर्षे पूर्ण होतात त्या वेळेला हा प्रकल्प पूर्णत्वाला जाईल अशी साऱ्यांनी अशा व्यक्त केली. स्वागत सरपंच अश्विनी गुरव यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. नंदकुमार कुंभार यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा