Breaking

रविवार, ८ जानेवारी, २०२३

*रेझिंग डे निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी जयसिंगपूर पोलीस ठाणेस दिली भेट*


रेझिंग डे निमित्त पोलीस ठाण्यास भेट


*मालोजीराव माने : कार्यकारी संपादक*


जयसिंगपूर : बारामतीचे अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी 'रेझिंग डे' निमित्त दैनंदिन कार्यपद्धती व अन्य गुन्हा संदर्भात माहिती होणेसाठी जयसिंगपूर पोलीस ठाणेस भेट दिली.

      जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक मा.राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनानुसार सुरुवातीस ठाणे अंमलदार मा.सागर मगदूम यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून रेझिंग डे व गुन्हा संदर्भात अर्थात FIR , गुन्हा  नोंदणीची नवीन ऑनलाईन पद्धत व बारणीशी या संदर्भात माहिती दिली.सौ.कोळी व सचिन चौगुले यांनी पोलीस वॉकी टॉकी या बाबत माहिती व कॉल घेण्याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले.

    गोपनीय विभागाचे विजय पाटील यांनी सुरू असलेल्या कामकाजाबाबत इथंभुत माहिती देत काही ज्वलंत उदाहरण दिली. यानंतर श्री.चंदर बन्ने यांनी पुरुष व महिला पोलीस कोठडी याबाबतची माहिती देऊन मुलांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण केले. सरते शेवटी, पोलीस ठाण्यातील विविध प्रकारची हत्यारे, रायफल्स, बुलेट्स व हातकडी याबाबतची महत्वाची माहिती दिली. तसेच पंचनामाच्या वेळी पुरावा म्हणून घेतलेली साधने,त्याच्या नोंदी व न्यायालयात हजर करण्यापर्यंतची सर्वकष माहिती दिली. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल मा.शेख होते.

         कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रभाकर माने यांनी पोलीस ठाण्याचे अधिकारी व इतर कर्मचारी यांचे आभार मानले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.के.डी.खळदकर, प्रा. परशुराम माने, प्रा.कु.माधुरी कोळी,विक्रांत माळी, गौरव पाटील,भोलू शर्मा व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे बाल रोग तज्ञ डॉ.रियाज अत्तार उपस्थित होते.

      सदर कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे यांनी प्रोत्साहित केले

1 टिप्पणी: