Breaking

रविवार, ८ जानेवारी, २०२३

*आटपाडीच्या कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी*


सावित्रीबाई फुले जयंती साजरी करताना प्राचार्य प्रा. डॉ. विजय पाटील व अन्य प्राध्यापक वृंद

*सौ.गीता माने : सह-संपादक*


आटपाडी : कला व विज्ञान महाविद्यालय, आटपाडी येथे  आद्य शिक्षिका व राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. 

      तत्कालीन समाज जीवनामध्ये अनेक कर्मठ रूढी परंपरा व अंधश्रद्धा यांचे वर्चस्व असतांनाही सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या साथीने पुण्याच्या भिलेवाडा येथे १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा स्थापन करून त्याच शाळेमध्ये मुलींना शिकवण्याचा भारतीय परंपरेमधील पहिला विक्रम त्यांनी केला. त्यामुळेच,  आज शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या देशाने  क्रांती घडवून आणली. शिवाय वर्तमान परिस्थितीत   देशातील सर्व स्त्रिया व पुरुष सावित्रीबाई फुले यांच्या कष्टामुळेच आज ज्ञानसंपन्न,  अर्थसंपन्न आणि स्वाभिमानीही आहेत. असे उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विजयकुमार पाटील यांनी जयंती कार्यक्रमा वेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. 

     राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य, डॉ. विजयकुमार पाटील आणि हिंदी विभागाच्या सहा.प्राध्यापिका एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी भारती देशमुखे  यांनी पुष्पहार घालून केले. या कार्यक्रमाचे आयोजन कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आले होते. 

      या कार्यक्रमाच्या वेळी मराठी विभागाचे सहा. प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे.  प्रा. सचिन सरक, प्रा. संतोष सावंत , प्रा. नागेश चंदनशिवे, श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्रा. हातेकर  प्रा.  सपाटे, महाविद्यालयाचे वरिष्ठ लेखनिक श्री. विश्वेश्वर खंदारे, श्री. एस. एम. पाटील,  श्री. नागेश कुंभार श्री. गोविंद पाटील, श्री. मारुती हेगडे,  आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा