![]() |
मार्गदर्शन करताना डॉ. काशिलिंग गावडे ,डॉ. संतोष जेठीथोर व अन्य मान्यवर |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
कागल : दि. 20/2/2023 रोजी इतिहास विभागाच्या वतीने 19 फेब्रुवारी छ.शिवाजी महाराज जयंती निमित्त 'छ.शिवाजी महाराजांना समजून घेताना' या विषयावर डॉ. काशिलिंग गावडे यांनी या विषयावर व्याख्यान दिले.
डॉ.गावडे यांनी आपल्या व्याख्यानातून संपूर्ण शिवचरित्राचा व्यापक असा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कसा चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातून येणाऱ्या पिढीला चुकीची दिशा दाखविली जात आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत येवू न देता दिशाभूल करण्याचे काम आज सुरू आहे. शिवाजी महाराज कधीही मुस्लिम द्वेष्टे नव्हते. उलट सर्वांना समानतेच्या पातळीवर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र आताचे राजकारणी त्यांचा उपयोग फक्त राजकारणासाठी करत आहेत. म्हणून आपण सर्वांनी जागे झाले पाहिजे व खरा इतिहास समजून घेतला पाहिजे. ताजमहाल व लालमहाल हे एकाच काळातील आहेत. परंतु ताजमहाल आजही इतिहासाची साक्ष म्हणून आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्याठिकाणी बालपण गेले तो लालमहाल मात्र कुठेच दिसत नाही. तिथेच असणारा शनिवारवाडा दिसतो. मग लालमहाल गेला कुठे? या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. समाजात मानवतावादी दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून समाजात जागृती केली पाहिजे. त्यांनी शिवचरित्राची अतिशय सखोल व अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. संतोष जेठीथोर यांनी करून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. ए.एम. शिरदवाडे यांनी भूषविले तर आभार प्रा. लतिका सावेकर यांनी मानले. सुत्रसंचालन कु. ऋतुजा शेवाळे यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. आदिनाथ गाडे, डॉ. लखन भोगम, प्रा. विनायक जाधव व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा