Breaking

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

*शाश्वत विकास व उत्तम-सुदृढ अर्थव्यवस्थेचा राजमार्ग म्हणजे सेंद्रिय शेती : माजी शिक्षण सहसंचालक प्रा.डॉ.हेमंत कटरे*


सुयेक व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना माजी शिक्षण सहसंचालक प्रा.डॉ. हेमंत कटरे व सुयेक चे विद्यमान अध्यक्ष डॉ. राहुल म्होपरे 


कोल्हापूर : येथील महावीर कॉलेजचे अर्थशास्त्र विभाग व सुयेकच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या  सुयेकच्या विशेष व्याख्यानमालेत 21 वे पुष्प प्रा. डॉ. हेमंत कटरे, राजाराम कॉलेज तथा माजी सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, कोल्हापूर यांनी 'सेंद्रिय शेतीची महत्व' या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली. 

   भारतामध्ये सेंद्रिय शेतीचा प्रवास कसा सुरू झाला,हरितक्रांती व सेंद्रिय शेतीचा असणारा परस्पर संबंध, त्याचे फायदे तोटे इ घटक सेंद्रिय शेतीच्या विकासासाठी कसे कारणीभूत ठरले याविषयी डॉ.कटरे यांनी आपले मत मांडले. त्याचबरोबर त्यांनी सेंद्रिय शेती करत असताना येणाऱ्या अडचणीचे व सेंद्रिय शेती शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून उत्तम आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. याबरोबरच सेंद्रिय शेती विषयी जाणीव जागृती  निर्माण होणे गरजेचे आहे असे मत त्यांनी मांडले. सेंद्रिय शेती हा शाश्वत विकासाचा  आणि उत्तम सुदृढ अर्थव्यवस्थेचा मार्ग आहे. असेही त्यांनी त्यांच्या व्याख्यानात नमूद केले. विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेतीच्या प्रकल्पाना भेटी देऊन सेंद्रिय शेतीचे प्रयोग आत्मसात करावेत असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सूचित केले.

   या व्याख्यानासाठी सुयेकचे विद्यमान अध्यक्ष डॉ. राहुल शंकर म्होपरे उपस्थित होते. व्याख्यानमालेमागील सुएकची भूमिका व  सुएकचे 33 वर्षातील कार्य यानुषंगाने त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

     महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी सेंद्रिय शेतीची पहाट होत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी वेळीच जागृत होऊन सेंद्रिय शेती आत्मसात करावी असे आवाहन केले.

      या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ.सुजाता पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ.संजय ओमासे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रा. अवधूत कांबळे यांनी मांनले. सूत्रसंचालन शितल चिखले आणि सौरभ पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

     प्रा. डॉ. हेमंत कटरे यांनी केलेली अभ्यासपूर्ण चौफेर मांडणी व सुयेकच्या व्याख्यानमालाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा