![]() |
मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रभाकर माने,प्राचार्य धनंजय कर्णिक व प्रा.डॉ. ढाले |
*प्रा. डॉ. मनोहर कोरे : उपसंपादक*
जयसिंगपूर : लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयात शिवजयंती निमित्त छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.प्रभाकर माने व अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ. धनंजय कर्णिक उपस्थित होते.
सुरुवातीस कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. ढाले यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.प्रभाकर माने व प्राचार्य प्रा.डॉ. धनंजय कर्णिक यांचे हस्ते शिवाजी राजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा.डॉ.प्रभाकर माने मनोगत व्यक्त करताना म्हणाले, शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांनी योग्य युद्धनीतीच्या माध्यमातून मराठी प्रदेश व मराठी भाषेची अस्मिता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.मराठी भाषेच्या वैभवाचे जनक म्हणून त्यांची ओळख होणे गरजेचे आहे. छ. शिवाजी राजे शूरवीर व पराक्रमी थोर पुरुष राजे होते. परंतु शिवाजी राजांची दुसरी बाजू अर्थात ते बुद्धिजीवी साहित्यिक व स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची शिकवण देणारे समतेचे दूत होते. शिवाजी राजांनी समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करून समतेचा बीजारोपण केले होते. त्यामुळे आज देखील छत्रपती शिवाजी राजांची लोकप्रियता टिकून असून ती दिवसेगणिक वृद्धिगत होत चालली आहे. शिवाजी राजेंनी स्वहस्ताक्षरात लिहिलेले अभंग तंजावर मधील सरस्वती महालात उपलब्ध आहेत. महाराजांनी लेखन व साहित्याला आश्रय देऊन साहित्याबद्दलचे प्रेम प्रकर्षाने दिसून येते. त्यांचे कृतिशील कार्य, दृष्टिपण, दूरदृष्टी आणि रयते प्रती असलेले प्रेमामुळेच चार शतकानंतरही राजे हे समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा देणारे अखंड ऊर्जेचे स्त्रोत असून त्यांच्या स्मृतीला त्रिवार अभिवादन
प्राचार्य प्रा.डॉ. धनंजय कर्णिक अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले, शिवाजी राजांनी निर्माण केलेले स्वराज्य खऱ्या अर्थाने रयतेचे सुराज्य कसं होईल तसेच शेतकरी-कष्टकरी प्रजेला सुख समाधानाने व सुरक्षितपणे जीवन आनंदाने कसं जगता येईल याचा विचार शिवाजी महाराजांच्या विचारात व कृतीत दिसून येतो.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ.ढाले यांनी मानले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.पाटील ,प्रा.मुजावर, श्री.कोळी,श्री.महेंद्र ठोमके व सौ. उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा