![]() |
जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत घेतली जाणारी एच.एस सी.परीक्षा(फेब्रुवारी, २०२३) अर्थात बारावीची परीक्षा मंगळवार दि.२१/०२/२०२३ पासून सुरु होत आहे. सदरची बैठक व्यवस्था जयसिंगपूर केंद्र क्रमांक ५११ जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे करण्यात आली आहे. तसेच विज्ञान विभागातील एकूण ७९५ परीक्षेची बैठक व्यवस्थेची सोय करण्यात आलेली आहे. परीक्षेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी पत्राद्वारे दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी जयसिंगपूर केंद्र क्रमांक ५११ चे केंद्र संचालक श्री बी.एन.कुंभार (संपर्क क्रमांक : ९९२२१०३८४७) व उपकेंद्र क्रमांक श्री.भारत आलदर (संपर्क क्रमांक : ९२२६७६३७७५) यांचेशी संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा