![]() |
सहायक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर पोलीस ठाणेस सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांची नवनियुक्ती झाली असून पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांची बदली करण्यात आली आहे.
कोल्हापूर पोलिस दलात जिल्ह्यांतर्गत मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक व सहायक निरीक्षक दर्जाच्या १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या निरीक्षकपदी शिवाजीनगर येथील महादेव वाघमोडे, राजारामपुरी पोलिस ठाण्याला अनिल तनपुरे, जुना राजवाडा येथे सतीशकुमार गुरव, जयसिंगूपरला गगनबावड्याचे रणजित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलिस अधीक्षक शैलेश बलवकडे यांनी सोमवारी रात्री बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
हातकणंगले पोलिस ठाण्याचे कोंडीराम पाटील व जयसिंगपूरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांची बदली करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांची बदली कोल्हापूर विमानतळ या ठिकाणी झाली आहे. गगनबावडा पोलिस ठाण्याचे रणजित पाटील यांची जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांची बदली स्थानीक गुन्हे शोध पथक कोल्हापूर (LCB) या ठिकाणी झाली आहे. हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के एन पाटील यांची बदली सुरक्षा शाखा कोल्हापूर याठिकाणी झाली आहे. तसेच नियंत्रण कक्ष कोल्हापूर येथून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी सत्यराव हाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष कोल्हापूर येथून महादेव तोंदले यांची हातकणंगले पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.तर कोल्हापूर जिल्हा बाहेर बदल्या झालेले अधिकारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे-नियंत्रण कक्ष (अहमदनगर), रवींद्र शेळके गडहिंग्लज (पुणे शहर), दत्तात्रय नाळे-जुना राजवाडा (रत्नागिरी), संजय मोरे-भुदरगड (सांगली), सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे-कागल (पुणे ग्रामीण), पोलिस उपनिरीक्षक सीमा बडे-हातकणंगले (पोलिस प्रशिक्षण केंद्र, तुरची, तासगाव)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा