Breaking

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

*राष्ट्र निर्माण व समाज परिवर्तनासाठी विवेकाचा मार्ग स्वीकारावा : प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.महावीर अक्कोळे यांचे प्रतिपादन*


मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते डॉ. महावीर अक्कोळे व अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.सुरत मांजरे 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये महाराष्ट्र विवेकवाहिनीचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.महावीर अक्कोळे व अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे हे होते.

    शिरोळ तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.महावीर अक्कोळे मार्गदर्शन करताना म्हणाले, पद्मश्री कालवश डॉ.नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र विवेक वाहिनीच्या माध्यमातून विवेकाची चळवळ उभी केली. समाजातील सर्व घटकांना सामाजिक समतेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला.डॉ. बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती करताना त्यांचा विशिष्ट उद्देश होता. तो हेतू विवेक वाहिनीच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न डॉ. दाभोळकरांनी केला.

      ते पुढे म्हणाले, समाजामध्ये अनिष्ट चालीरीती व परंपरा असून त्याचे वेळीच निर्मूलन केलं नाही तर देश बेबंदशाही व्यवस्थेकडे वाटचाल करतो. समाजामध्ये जाती,धर्म व प्रांताच्या माध्यमातून दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र विवेकवाहिनीची चळवळ देशातील प्रत्येक घटकाला विवेक वादाचा स्वीकार करण्यास प्रोत्साहित करते. यासाठी राष्ट्र निर्माण व समाज परिवर्तनासाठी विवेकाचा मार्ग स्वीकारावा असे प्रतिपादन याप्रसंगी केले.

     अध्यक्षस्थाना वरून बोलताना प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे म्हणाले,डॉ.महावीर अक्कोळे यांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विवेक माध्यमातून निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात कार्यरत राहिल्यास स्वतःचे सामाजिक व्यक्तिमत्व बदलू शकते. तसेच विवेक वाहिनीची चळवळ ही काळाची गरज असून त्या चळवळीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांने सहभागी झाले पाहिजे.

      या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.सौ. सुनंदा शेळके व पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. नितीश सावंत यांनी केला. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन प्रा. सुरज चौगुले यांनी केले.या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. सुजाता पाटील यांनी केले.

     सदर कार्यक्रमास प्रा.डॉ. तुषार घाटगे, डॉ.के.डी.खळदकर,डॉ. प्रभाकर  माने,डॉ. महावीर बुरसे,प्रा. किरण पाटील,डॉ.संदिप तापकिर प्रा.ए.डी.शिंदे, डॉ.वंदना देवकर, प्रा. बाळगोंडा पाटील,प्रा. परशुराम माने, प्रा.महाराष्ट्र विवेक वाहिनीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा