![]() |
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर परीक्षा विभाग |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील ऑक्टो. / नोव्हे. २०२२ हिवाळी सत्रातील अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध परीक्षा केंद्रावर सुरू आहेत. तथापि, अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती यांनी दि. २ फेब्रुवारी, २०२३ पासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू केले आहे.
सदर आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये व्यत्यय येत असल्याने दि. २ फेब्रुवारी, २०२३ रोजीच्या विद्यापीठामार्फत घेण्यात येणा-या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आली होती.
तथापि सदरचा परीक्षा कामावरील बहिष्कार अद्यापही सुरू असल्याने दि. ३ फेब्रुवारी,२०२३ व दि. ४ फेब्रुवारी,२०२३ रोजीच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत यांचीस र्व महाविद्यालये / शिक्षणसंस्था / सर्व अधिविभाग, विद्यार्थी, पालक, शिक्षक व संबंधित घटक यांनी नोंद घ्यावी.
तसेच दिनांक ३ फेब्रुवारी, २०२३ पासून स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक व सविस्तर माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल अशी माहिती डॉ. अजितसिंह जाधव (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ) यांनी परिपत्रकाद्वारे जारी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा