Breaking

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

B.Ed अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना टेट (TAIT) परीक्षेसाठी पात्र करा - विविध संघटनांची मागणी

 

संग्रहित छायाचित्र 

✍🏼पत्रकार - मालोजीराव माने (कार्यकारी संपादक)


         महाराष्ट्र : महाराष्ट्र शासनातर्फे तब्बल पाच वर्षानंतर शिक्षक अभियोग्यता परीक्षा ( TAIT ) घेतली जात आहे. परंतु नियमावलीनुसार B.ed पूर्ण असल्याशिवाय ही परीक्षा देता येत नाही. मात्र कोरोना मुळे उशिरा बी.एड प्रवेश झाल्यामुळे B.Ed अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना टेट (TAIT) परीक्षेसाठी पात्र करा अशी मागणी विविध संघटना करत आहेत. तसेच नुकतीच CTET परीक्षा घेतली गेली आहे, त्याचा निकाल लागेपर्यंत टेट (TAIT) परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी देखील केली जात आहे.


       मा.उच्च न्यायालयाचे आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरती ची टेट (TAIT) परिक्षा फेब्रुवारी 2023 मध्ये आयोजित केले आहे. यासंबंधीची शासकीय परिपत्रक देखील निर्गमित केले आहे. सदरची टेट ( TAIT ) परीक्षा 2017 नंतर 2023  मध्ये पाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर घेतली जात आहे.


      कोरोना लॉकडाऊन मुळे या विद्यार्थ्याचं शैक्षणिक  वर्ष सुरू होण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे B.ed अंतिम वर्षाचे अगदी काहीच महिने शिल्लक राहिलेले विद्यार्थी टेट (TAIT) परीक्षेला पात्र होण्याची संधी गमावत आहेत. पाच वर्षानंतर घेतली जाणारी ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाईल याची शाश्वती नसल्याने विद्यार्थी निराशेत आहेत.

     राज्य सेवा परीक्षा तसेच CTET परीक्षेमध्ये देखील पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस मुभा असते. त्याच धर्तीवर बी.एड अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राचे अगदी काहीच महिने बाकी असल्यामुळे त्यांच्या वर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन अंतिम वर्षाच्या  विद्यार्थ्याना या परीक्षेस पात्र करण्याची मागणी विविध संघटना मार्फत केली जात आहे.

     संबंधित यंत्रणांना अर्ज देणे, सोशल मीडिया, ट्विटर वर #TAIT_Exam , #postpone-tait-exam असा ट्रेण्ड जोर धरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा