![]() |
सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील व गुन्हे शोध पथकातील टीम व संशयीत आरोपी हसन जमादार |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : रात्रीच्या वेळी फुटपाथ वर झोपलेल्या वयस्कर मनोरुग्ण महीलेता जवळ असलेले पैसे काढुन घेवुन तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने दगडाने व पेवींग ब्लॉक डोकीत मारहाण करुन गंभीर जखमी केलेल्या अज्ञात आरोपीस १२ दिवसात अटक करण्यात पोलिसांना यश आले.
पोलीस सूत्राकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार सदर गंभीर जखमी महिला गेले 10 वर्षापासुन मनोरुग्ण असुन ती मालु हायस्कुल शेजारी असलेल्या महात्मा जोतीबा फुले भाजीपाला मार्केट जयसिंगपूर मध्ये हमालीचे काम करुन ती गेले 6 महीन्यापासुन मालु हायस्कुल समोर फुटपाथवर पानपट्टी ढकल गाड्याजवळ झोपत होती. वरील तारखेस वेळी व ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणा वरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जखमी हिचे डोकीत पेवींग ब्लॉक व दगड मारुन गंभीर जखमी केले.रविंद्र आण्णाप्पा गाडीवडर यांनी गुन्ह्याची फिर्याद दिली होती. गुन्ह्यातील जखमी महीला हि मनोरुग्ण असल्याने व नेहमी महात्मा जोतीबा फुले भाजीपाला मार्केट येथे हमालीचे काम करुन ती फुटपाथवर झोपत असल्याने तिला कोणी त्रास देते होते काय, तिच्याशी कोणी गैरवर्तन करत होते काय याबाबत गोपणीय बातमीदारा कडुन माहीती घेतली.अज्ञात आरोपीचा शोध घेताना अडचणी येत होत्या. तसेच गुन्हा घडले नंतर दिवासा व रात्रीच्या वेळी फिरणारे, दारुचे व्यसनी अशा एकुण 40 ते 50 लोकांचे कडे चौकशी करुन त्यांचे कडुन माहीती घेतली. त्यानंतर अज्ञात आरोपीचा शोध सुरु असताना गोपणीय बातमीदारांकडुन माहीती मिळाली, गुन्ह्यातील जखमी महीला ही मनोरुग्ण असुन सुध्दा ती मार्केट मध्ये काम करायची, तसेच येणा जाणाऱ्या लोकांचे कडुन पैसे मागुन घ्यायची व जमलेले सर्व स्वत:जवळ ठेवायची. रविवारी तिच्या जवळ असलेले पैसे ती मोजत असताना, यातील संशयित आरोपी हसन अमरशरीफ जमादार वय 20 वर्ष, रा. गल्ली नं. 13, रणविर चौक, जयसिंगपूर, ता. शिरोळ यांने पाहीले होते. आरोपी हा दारुचा व्यसनी असुन कोणताही कामधंदा करत नाही. तसेच आरोपी हा जखमी महीलेच्या घराजवळ राहणारा असुन महीला त्याला ओळखत होती. त्यांनेच दारुच्या पैशासाठी जखमी महीलेवर पाळत ठेवुन तिला मारहाण करुन तिच्या जवळील पैसे काढुन घेतले असावेत अशी बातमी मिळाल्याने त्यास ताब्यात व विश्वासात घेवुन त्याचे कडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांने दारुच्या पैशासाठी सदर महीलेवर पाळत ठेवुन ती मालु हायस्कुल गेट समोर फुटपाथवर झोपली असताना तिच्या जवळील पैसे काढुन घेत होता. त्यावेळेस सदर महिलेने आरडा ओरडा केल्याने तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिथेच पडलेल्या दगडाने व पेवींग ब्लॉक ने तिच्या डोकीत मारुन तिला गंभीर जखमी केल्या बाबत कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली.
जयसिंगपूर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, पोलीस अंमलदार निलेश मांजरे, अभिजीत भातमारे, संदेश शेटे, अमोल अवघडे, रोहीत डावाळे, वैभव सुर्यवंशी, आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आपल्या कौशल्यपूर्ण हातोटीने संशयित आरोपीस पकडून अटक केल्याने जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा