![]() |
डॉ.सौ.सुपर्णा गंगाधर संसुद्धी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी, बारामतीचे प्रा.सौ.सुपर्णा गंगाधर संसुद्धी यांनी "इक्कीसवीं सदी के उपन्यासों में प्रतिबिंबित बदलते मूल्य" या शीर्षकाखाली हिंदी विषयातील पीएच. डी.चा प्रबंध स्वा.रा.ती. मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्यापीठात सादर केला होता. विद्यापीठाकडून प्रा.सौ.संसुद्धी यांना या विषयातील पीएच.डी.पदवी जाहीर करण्यात आली. सदर कामी पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून डॉ. मुकुंद कवडे ( हिंदी विभाग, पीपल्स कॉलेज, नांदेड) लाभले.
प्रा.सौ.सुपर्णा गंगाधर संसुद्धी यांचा शैक्षणिक प्रवास अर्थात बी. ए. पदवी कन्या महाविद्यालय सांगली, एम.ए. हिंदी कस्तुरबाई वालचंद कॉलेज, सांगली येथून संपादन केली आहे.एम.फील. पदवी (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) डॉ. व्ही.के.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. त्या सन १९९३ पासून ते आज तागायत हिंदी विषयातील सक्रिय,अभ्यासू व विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
प्रा.सौ.सुपर्णा संसुद्धी यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान भरीव असून त्या सूत्रसंचालिका म्हणून प्रसिद्ध आहेत. सांगली आकाशवाणी केंद्राच्या हिंदीवार्ता' व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांचे विचार व मधुर वाणी लोकांच्या पर्यंत पोहोचलेली आहे. कॉलेजच्या सांस्कृतिक विभागातून त्यांचं काम वाखण्याजोगे आहे. हिंदी विषयात असणारी त्यांची हातोटी व उत्तम वक्तृत्व याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा एक व्यक्तिमत्त्व तयार केले आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली आहे. महाविद्यालयात एक अभ्यासू, शांत व संयमी प्राध्यापिका म्हणून त्यांचा परिचय आहे.
पीएच.डी.कामी परिवारातील पती डॉ. गंगाधर संसुद्धी यांचे प्रोत्साहन लाभले. मुलगी कु. अनुराधा हिचे मोलाचे सहकार्य लाभले. शिवाजी विद्यापीठ सुटा संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते कालवश प्रा. व्ही. बी. दडगे यांच्या त्या कन्या आहेत.
स्थानिक समितीचे चेअरमन डॉ.सुभाष अडदंडे,सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार श्री. पद्माकर पाटील, सर्व सन्माननीय सदस्य, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,सर्व सहकारी प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी ,हिंदी विभाग प्रमुख डॉ. बनसोडे यांचे उत्तम सहकार्य लाभले आहे.
प्रा.सौ.संसुद्धी यांनी पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल सर्व घटकातून त्यांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा