![]() |
प्रमुख पाहुणे डॉ. संजय धांडे, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव विलास शिंदे डॉ.विलास शिंदे व परीक्षा संचालक डॉ. अजित सिंह जाधव |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी ‘लाईफ लाँग लर्नर’ अर्थात आयुष्यभर शिकण्याच्या प्रक्रियेत व्यस्त राहावे आणि काळानुरुप आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन आय.आय.टी. कानपूरचे माजी संचालक प्रा. संजय धांडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस होते. ते समारंभात ऑनलाईन सहभागी झाले. मंचावर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेचे सदस्य विराजमान होते.
![]() |
डॉ. अजित सिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक |
विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ दोन वर्षांनी ऑफलाईन स्वरुपात झाला. त्यामुळे उपस्थितांचा आणि स्नातकांचा उत्साह अतिशय ओसंडून वाहात होता.
प्रा. धांडे यांनी आपल्या दीक्षान्त मार्गदर्शनात निरंतर शिक्षण, मूल्ये आणि कौशल्ये या बाबींवर भर दिला. स्नातकांना विद्यापीठाची पदवी घेऊन आता जीवनाच्या ‘लाईफ लाँग लर्निंग’ या ‘थ्री-एल’ विद्यापीठात प्रविष्ट होत असल्याची जाणीव करून देताना प्रा. धांडे म्हणाले, जीवनाच्या या विद्यापीठात कोणती परीक्षा नाही की गुण नाहीत, प्रमाणपत्र नाही की लेक्चर्स आणि प्रॅक्टिकलही नाहीत. मात्र, या विद्यापीठातील सर्व विद्यार्थी अनुभवातून शिकत आहेत. आजचे जग हे फार गतीने बदलते आहे. कोविडनंतर तर या बदलांचा वेग अधिकच वाढला आहे. या बदलत्या परिस्थितीत, काही कौशल्ये कालबाह्य होत आहेत. तर काही नवी कौशल्ये उदयास येत आहेत. या कौशल्यांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे आज एखाद्याने स्वतःहून नवीन कौशल्य आत्मसात करणे, हेच खरे शिक्षण आहे, जे आजच्या जगात अतिशय आवश्यक बनले आहे.
मानवी मूल्ये आणि नैतिकतेचा पाया हा जीवनाचा मूलभूत घटक असल्याचे सांगून प्रा. धांडे म्हणाले, अनुभव हा महान शिक्षक आहे. तुम्ही आता या लाइफ लाँग लर्निंग युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असाल आणि तुमचा शिक्षक म्हणून अनुभव घ्याल. या विद्यापीठात पदवी नाही. तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी राहाल. ही एक प्रक्रिया आहे जी तुमचे जीवन सतत समृद्ध करते. जग आज खूप गुंतागुंतीचे बनले आहे. विचलित करणाऱ्या बाबी भोवताली अधिक आहेत. अनेक मोहमयी पण धोकादायक मार्ग तुमच्या आजूबाजूला नेहमी खुणावत असतात. वैयक्तिक सचोटी आणि आर्थिक प्रामाणिकपणा याच त्या महत्त्वाच्या बाबी आहेत, ज्या या जगात आत्मसात करणे आवश्यक आहे.
डिजीटल एकलव्यांची गरज’
एकलव्याच्या कथेचे उदाहरण देताना प्रा. धंडे पुढे म्हणाले, धनुर्विद्येची सर्व कौशल्ये एकलव्याने स्वतः शिकून घेतली आणि आत्मसात केली. त्याने आपल्या हाताच्या अंगठ्याचाही गुरुदक्षिणेपोटी त्याग केला आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा पायांनी धनुर्विद्येचे कौशल्य आत्मसात केले. आजच्या युगात अशा एक नव्हे, तर अनेक एकलव्यांची देशाला गरज आहे. अशा व्यक्तीला तुम्ही ‘डिजीटल एकलव्य’ म्हणू शकता.
एकलव्याप्रमाणे बनण्यासाठी आवश्यक पैलूंचा ऊहापोहही प्रा. धांडे यांनी केला. ते म्हणाले, आपल्या अंतरात्म्यात थोडी भूक असायला हवी. शिक्षण हे पुल (PULL) मॉडेल आहे, पुश (PUSH) मॉडेल नव्हे. दुर्दैवाने, पालक, मित्र आणि इतरेजनांच्या दबावामुळे अनेक विद्यार्थ्यांची अशी भावना असते की, त्यांना असे काहीतरी शिकण्यास भाग पाडले जाते, जे त्यांना मुळीच शिकायचे नाही. प्रत्येक तरुणामध्ये काही ना काही भूक नक्कीच असते. समाजाने ती भूक शमविण्यासाठी साह्यभूत व्हायला हवे. आर्थिक यश प्रत्येक क्षेत्रात असतेच. तथापि, तरुणांनी नेहमी त्यांना ज्या गोष्टीचा अभ्यास आणि पाठपुरावा करायचा आहे, त्याचे अनुसरण केले पाहिजे. कौशल्य शिकण्याची आणि आत्मसात करण्याची भूक स्वाभाविकपणे कुतूहल वृद्धिंगत करते. त्यामुळे कुतूहल ही एक आवश्यक गोष्ट आहे. युवा पिढीला जग आणि त्याच्या वाटचालीचे विविध मार्ग याबद्दल कुतूहल असलेच पाहिजे. कुतूहलाच्या या पैलूला समाजाने खतपाणी घालून तो वृद्धिंगत केला पाहिजे. त्याची जोपासना केली पाहिजे. कुतूहलाच्या भावनेतूनच पुढे निरीक्षणाच्या कौशल्यांचा जन्म होतो. उत्कट निरीक्षणे ही यासाठी अजून एक आवश्यक गोष्ट आहे. हे खूप महत्वाचे आहे कारण सध्याच्या व्यवस्थेतील अनेक त्रुटी आणि चांगल्या गोष्टी या चांगल्या निरीक्षणातूनच समजून घेता येऊ शकतात. निरीक्षणांती तुमच्या मनात काही प्रश्न निश्चित उद्भवतील. जेव्हा तुम्हाला तुमच्या या प्रश्नांची उत्तरे मिळतात, तेव्हाच वस्तुतः तुमचे खरे शिक्षण सुरू होते. प्रश्नोत्तर संवाद हाच शिक्षणाचा पाया असून त्यात सातत्या राहिले तरच त्यांचे कौशल्यात रुपांतर होते.
सध्याच्या काळात तरुणाईमध्ये विचलित होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून ते म्हणाले, तरुण-तरुणी इतके अनियंत्रित झाले आहेत की, कोणतीही शिस्त पाळत नाहीत. जेव्हा तारुण्य संपते तेव्हा आपल्या हातून वेळ निसटून गेल्याची वेदनादायक जाणीव होते. तेव्हा पराभूत आणि दुर्लक्षितपणाची भावना दाटून येते. जर तुम्हाला अशी परिस्थिती टाळायची असेल तर कृपया जीवनशैलीत काही शिस्त पाळणे आवश्यक आहे. कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आणि काही क्षेत्रात प्रवीण होण्यासाठी प्रचंड सराव आवश्यक आहे.
मार्केटचा रेटा जिकडे, त्या शाखेकडे जाण्याची विद्यार्थ्यांची प्रवृत्ती कमी होण्याची गरज अधोरेखित करताना प्रा. धांडे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा कौशल्य आणि मूल्ये या दोन पैलूंवर मोठा भर आहे. लाइफ लाँग लर्निंग युनिव्हर्सिटीचे ते आधार आहेत. या मूल्यांची बीजे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेदरम्यान रुजविण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे. त्याचप्रमाणे बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम अवलंबित असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिवडीचे स्वातंत्र्य विद्यापीठांनी द्यायला हवे. अगदी खालच्या स्तरावरील शिक्षणानेही व्यापक, मूल्याधारित शिक्षणाचा पाया प्रदान केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचे व्यावसायिक आयुष्य ४० ते ४५ वर्षांचे असते. या प्रदीर्घ कालावधीत तंत्रज्ञान बदलते आणि उच्च शिक्षणात घेतलेले चार वर्षांचे शिक्षण तिथे थिटे पडते. म्हणून, बहु-विद्याशाखीय अभ्यासाची सवय लावून घेत निरंतर शिकत राहणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गुळवणी यांनी आपापल्या विद्याशाखेच्या स्नातकांना सादर केले आणि कुलपतींना त्यांचेवर पदवी प्रदान करून अनुग्रह करण्याची विनंती केली.
*१५ हजारांहून अधिक तरुणाईचा उत्साही वावर*
या वर्षी*ऑनलाईन एक हजार जणांची उपस्थिती* : दीक्षान्त समारंभास सुमारे दीड हजार विद्यार्थी, स्नातक व नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ युट्यूब वाहिनीवरून थेट प्रसारणही करण्यात आले. या कार्यक्रमाचा देशविदशांतील एक हजार प्रेक्षकांनी लाभ घेतला. जनसंपर्क कक्ष आणि संगणक कक्ष यांनी त्याचे नियोजन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा