यिन संवाद साधताना सिने अभिनेत्री हृदा दुर्गुळे व सिने अभिनेते वैभव तत्ववादी व विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : बारामतीच्या अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित यिन संवाद कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी सिने अभिनेत्री हृदा दुर्गुळे व सिने अभिनेते वैभव तत्ववादी यांनी विद्यार्थ्यांशी 'यीन संवाद' साधला.
विद्यार्थ्यांशी यिन संवाद साधताना सिने अभिनेत्री हृदा दुर्गुळे म्हणाल्या,जयसिंगपूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र विकासाचे स्पिरिट असून या महाविद्यालयाचा शैक्षणिक लौकिक उत्तम व प्रचंड आहे. यापुढेही यिनच्या माध्यमातून आपण सर्वांनी राष्ट्रनिर्मिती व बहुश्रुत व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी संधी निर्माण होत आहे.
सिने अभिनेते वैभव तत्ववादी म्हणाले, सकाळ माध्यम समूह नेहमीच समाज घटकासाठी रचनात्मक उपक्रम राबवीत असते. मात्र विशेष करून विद्यार्थी वर्गासाठी यीनच्या माध्यमातून विद्यार्थी घटकासाठी एक नामी संधी उपलब्ध करून दिली आहे याचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे प्रतिपादन केले.
*यिन संवाद कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये*
१) यिन संवादासाठी विद्यार्थी वर्गामध्ये प्रचंड उत्सुकता होती.
२) यिन संवादासाठी उत्तम व नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती.
३) यिन संवादासाठी खुल्या व्यासपीठाचा वापर करण्यात आला.
४) यिन संवादसाठी भर उन्हात विद्यार्थ्यांनी दिला उत्तम प्रतिसाद.
५) सिने अभिनेत्री हृदा दुर्गुळे व सिने अभिनेते वैभव तत्ववादी यांना पाहण्यासाठी,भेटण्यासाठी व संवाद साधण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता.
६) अत्यंत उत्साही, प्रसन्न व जल्लोषपूर्ण यिन संवाद साधण्यात आला.
७) विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची प्रचंड गर्दी होती.
८) प्रत्येक आनंदीक्षण कॅमेरात टिपण्यासाठी व यिन संवाद रेकॉर्डिंग करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल होता.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष अडदंडे होते. या कार्यक्रमाचे आभार यिन अध्यक्ष सिद्धार्थ शिराळे मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.सौ.अंजना चावरे व प्रा. सुनील चौगुले यांनी केले.
याप्रसंगी अवधूत गायकवाड सकाळ यिन सहायक व्यवस्थापक, अशोक शिरगुप्पे, प्रा.भगाटे,प्रा. अभिजीत अडदंडे, इतर पदाधिकारी, यिन उपाध्यक्ष प्रतिक कोरे,प्राध्यापक वर्ग व शेकडोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा