Breaking

गुरुवार, ३० मार्च, २०२३

*राष्ट्रीय सेवा योजनेला उभारी देण्यासाठी व वित्तीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी PMFS या आधुनिक कौशल्यपूर्ण तंत्रज्ञानाची गरज : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के*


कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. डी. टी.शिर्के, प्र.कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, संचालक डॉ.तानाजी चौगले व डॉ.माळी


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने PFMS चे प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. त्या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के , प्र-कुलगुरू डॉ.पी.एस. पाटील व राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे नूतन संचालक डॉ. तानाजी चौगले हे मान्यवर उपस्थित होते.

        प्रारंभी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी नूतन संचालक डॉ. चौगले यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात भरीव कामगिरी सर्व घटकांकडून झाली पाहिजे. त्याचबरोबर शासनाच्या वेळोवेळी केलेल्या परिपत्रक व निर्देशाचे पालन करून राष्ट्रीय सेवा योजना विभाग सर्व पातळीवर सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी  PFMS चे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या आधारे रासेयो ची वित्तीय व्यवस्था व व्यवहार मजबूत, गतिमान व पारदर्शक बनेल अशी खात्री आहे.कुलगुरू डॉ.शिर्के पुढे म्हणाले,राष्ट्रीय सेवा योजनेला उभारी देण्यासाठी व वित्तीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी PMFS या आधुनिक कौशल्यपूर्ण तंत्रज्ञानाची गरज आहे. त्या अनुषंगाने ही मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा म्हणजे रासेयो विकासाला बळ देणारी आहे.

       राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे नूतन संचालक डॉ. तानाजी चौगले यांनी या मार्ग सर्व प्रशिक्षण कार्यशाळेतील.सर्व उपस्थित घटकांचे स्वागत करून आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.डॉ. चौगले यांनी स्वतः साधन व्यक्ती म्हणून PFMS  प्रशिक्षण कार्यशाळेत ZBCA खाते उघडणे व खात्याचे मॅपिंग करणे यासंदर्भात पद्धतशीर व अभ्यासपूर्ण माहिती दिली.यावेळी डॉ. चौगले व श्री.मुंडे यांनी अकाउंट मॅपिंग बद्दल विचारलेला प्रश्नाचे निराकरण केले.

     या दरम्यान सांगली जिल्हा समन्वयक डॉ.माळी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध शिबिरा बाबत माहिती दिली.

       सदर प्रशिक्षण कार्यशाळेसाठी १७८ महाविद्यालयातून २८०  कार्यक्रम अधिकारी व अकाउंटंट उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी कार्यक्रम अधिकाऱ्यानी उत्तम प्रतिसाद दिला.

       यावेळी नूतन संचालक डॉ. तानाजी चौगले यांचा सत्कार कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला. या कार्यक्रमाचा आभार डॉ.माळी यांनी केले.तर उत्तम सूत्रसंचालन डॉ. संदीप पाटील यांनी केले.

      PMFS चे प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली असून उपस्थित कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या कडून या कार्यशाळा आयोजनाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा