Breaking

शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे २२ संशोधक एडी वर्ल्ड सायंटिफिक रँकिंग मध्ये


कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा,


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या क्लस्टर युनिव्हर्सिटी मधील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा व छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या महाविद्यालयातील २२ प्राध्यापकांचा समावेश अल्फर-डॉजर वर्ल्ड सायंटिस्ट रँकिंग म्हणजेच ए-डी सायंटिफिक इंडेक्स २०२३ मध्ये समावेश झाला आहे. ए-डी सायंटिफिक इंडेक्स हा एक जागतिक शास्त्रज्ञांच्या रँकिंगचा इंडेक्स असून प्रतिवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संशोधकांनी केलेल्या संशोधन व त्यास प्राप्त झालेल्या सायटेशन इंडेक्सनुसार रँकिंग केले जाते. विद्यापीठाचे अग्रणी महाविद्यालय असलेल्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा या महाविद्यालयातील डॉ. जयकुमार चव्हाण, डॉ. महेंद्र अहिरे, डॉ. प्रमोद चव्हाण, डॉ. माधुरी बर्गे, डॉ.अभिजीत कदम, डॉ.सलीम मुजावर, डॉ. पद्मिनी पवार, डॉ. शरदकुमार निंबाळे, डॉ. अभिनव माळी, डॉ. सुनीता झनके, डॉ. शशिकांत शिंदे, डॉ. सुशांत पोळ, डॉ. सुनील बरकडे, डॉ. नंदकुमार माने, डॉ. धनाजी जाधव व  डॉ. नेहा बेंद्रे या प्राध्यापकांचा समावेश ए-डी सायंटिफिक इंडेक्स २०२३ मध्ये झालेला आहे. विद्यापीठाचे घटक महाविद्यालय धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील  डॉ. गणेश जाधव, डॉ. विजय कुंभार, डॉ.  संजय यादव तर छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील डॉ. अभिमान निमसे, डॉ. अभिजीत पोरे व डॉ. अनिलकुमार वावरे या  संशोधकांचा समावेश एडी वर्ल्ड सायंटिफिक इंडेक्स २०२३ मध्ये झालेला आहे. 

         जागतिक रँकिंग मध्ये समावेश झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलाधिकारी मा. श्री चंद्रकांत दळवी, मा. कुलगुरू प्रा. डॉ. डी टी शिर्के विद्यापीठाचे सर्व अधिष्ठाता, कुलसचिव व पदाधिकाऱ्यांनी सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा