✍🏼 पत्रकार मालोजीराव माने
सांगली : येथील श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून युवा शाहीर पृथ्वीराज माळी यांची उपस्थिती लाभली होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझिम, मर्दानी खेळ यांचे सादरीकरण केले. तसेच महाराजांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांचे नाट्यही सादर केले.
![]() |
युवा शाहीर पृथ्वीराज माळी यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. मरजे सर |
यावेळी प्रमुख पाहुणे शाहीर माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराजांचे कर्तुत्व पाहता त्यांची रोज जयंती केली तरी कमीच पडेल. महाराजांचे विचार जोपासणे हीच खरी शिवजयंती आहे, असे विचार मांडले.
मातांनो शिवाजी महाराज घडवण्याची क्षमता फक्त तुम्हा स्त्रीशक्ती मध्येच आहे, त्यामुळे ते वैचारिक बाळकडू स्वतःही घ्या आणि येणाऱ्या पिढीकडेही पोहोचवा.
शाहीर पृथ्वीराज माळी
![]() |
शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत - अनिकेत पाटील, तर बाल संभाजी रुपात राजवीर बोंदर |
महाविद्यालयाच्या ज्योती कुलामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ बी. पी. मरजे अध्यक्ष म्हणून लाभले होते.
कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.युवराज पवार आणि ज्योती कुल मार्गदर्शक प्रा.डॉ. सुशील कुमार, श्रीमती गायत्री जाधव तसेच प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर, प्रा.दयानंद बोंदर, प्रा.वैशाली गायकवाड, प्रा.मुक्ता पाटील ,ग्रंथपाल संध्या यादव आणि बी.एड प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा