![]() |
औरवाडच्या स्मशानभूमीची स्वच्छता करताना श्री.नारायण गावडे |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
नृसिंहवाडी : औरवाड गावातील ज्येष्ठ व सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच विशेष कार्यकारी अधिकारी सुकाणू समिती उपाध्यक्ष मा. श्री नारायण रावसो गावडे यांचा आज 68 वा वाढदिवस होता.याप्रसंगी त्यांनी औरवाड मधील स्मशानभूमी व परिसराची स्वच्छता आपले सहकारी व समस्त मराठा समाज यांच्या मदतीने केली.
समाजामध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठी स्पर्धा लागलेली असते.गावामध्ये मोठीच्या मोठी डिजिटल बोर्ड लावून शुभेच्छा देणे,मोठा केक आणून डीजे च्या तालावर तो कापने,जेवणावळ्या करणे यातून चंगळवादी वृत्तीचे लक्षण दिसत आहे. यातून काही तरुण व्यसनी सुद्धा होताना दिसत आहेत. या तरुण पिढीला व समाजाला आदर्शवत वाटावे यासाठी काही उदाहरणे तरुणांना हवे असतात यापैकीच आदर्शवत उदाहरण म्हणून गावडे यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.
आपला वाढदिवस म्हणजे नवीन कपडे कपडे घालने, शुभेच्छांचा स्वीकार करणे एवढेच नसून आपले समाजाप्रती काही देणे आहे हे सुद्धा लक्षात असणे गरजेचे असते.याचीच प्रचिती या स्मशानभूमीच्या स्वच्छतेने आपल्याला येते. या परिसरात नेहमी स्वच्छता असावी यासाठी सर्वांनी या उदाहरणाचा आदर्श घ्यावा.
श्री.गावडे यांनी वाढदिनी केलेल्या कार्याचे औरवाड सह शिरोळ तालुक्यात कौतुक होत आहे. त्यांच्या या समाज रुपी कार्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
प्रा. चिदानंद अळोळी व जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने श्री.गावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा