![]() |
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा दीक्षांत समारंभ केंद्रीय पध्दतीने बुधवार दि. २९ मार्च, २०२३ रोजी सकाळी ११:४५ वाजता विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशिय सभागृहात संपन्न झाला असून, सदर समारंभामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी एकूण ६६४५७ विद्यार्थ्यानी अर्ज केले होते. पैकी १६५९४ इतक्या विद्यार्थ्यानी समक्ष पदवी प्रमाणपत्र स्विकारणेसाठी अर्ज केले होते व ४९८६३ इतक्या विद्यार्थ्यानी पोष्टाद्वारे पदवी प्रमाणपत्रे मागणी केली होती.
त्यानुषंगाने ४९८६३ विद्यार्थ्याची पदवी प्रमाणपत्रे काल दि. ३०/०३/२०२३ रोजी पोष्टाद्वारे पाठविण्याबाबतची कार्यवाही करण्यात आली आहे.
तसेच दि. २९/०३/२०२३ रोजी झालेल्या दीक्षांत समारंभामध्ये एकूण १६५९४ विद्यार्थ्यांपैकी ९२८७ इतक्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्र स्विकारले आहेत व उर्वरित ७३०७ विद्यार्थ्यानी पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समांरभादिवशी स्विकारलेली नाहीत अशा विद्यार्थ्याना १० दिवसामध्ये सदरची पदवी प्रमाणपत्रे स्विकारण्याबाबत SMS द्वारे अवगत करण्यात येईल व त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रे स्विकारलेली नाहीत अशा विद्यार्थ्याना १० दिवसानंतर पोष्टाद्वारे पदवी प्रमाणपत्रे त्यांचे पत्यावर पाठविण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज ऑप्शन सिलेक्ट केलं होतं अशा सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांना सदरची पदवी पोस्टद्वारे प्राप्त होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा