![]() |
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. धवलकुमार पाटील, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, उपप्राचार्य भारत आलदर व पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे |
*प्रा.सौ.अंजना चौगुले-चावरे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये सोमवार दि.२४ एप्रिल २०२३ रोजी अकरावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल जाहीर झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य व प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.धवल पाटील आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात अकरावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. धवल पाटील म्हणाले, प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यामुळे प्रत्येकाचा व्यक्तिमत्व त्या आधारावर निश्चित होत असते. जयसिंगपूर महाविद्यालय आपणास गुणवत्तापूर्ण शैक्षणिक मार्गदर्शन करीत असते. या उत्तम मार्गदर्शनाच्या आधारावर आपलं व्यक्तिमत्व फुलवू शकता.
अध्यक्षीय स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.सुरत मांजरे म्हणाले, आज तागायत जयसिंगपूर कॉलेजने उत्तम व कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्याचं काम केले. महाविद्यालयाच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धीगत करणे, स्पर्धा परीक्षेची व्यवस्था करणे, कौशल्य प्रदान करणे, एनसीसी व स्काऊट गाईडच्या माध्यमातून सर्वांग सुंदर व्यक्तिमत्त्व घडवणे व सुप्त गुणांना संधी उपलब्ध करून देणे या पद्धतीचे कार्य सातत्याने सुरू असते. यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक व प्रशासकीय सेवक कार्यक्षम व कटिबद्ध आहेत.
अकरावी कला शाखेचा निकाल गुणानुक्रमे खालील पद्धतीने प्रथम स्थानी कु.खुशबू इसाक बागसार, द्वितीय स्थानी कु.आकांक्षा राजमाने आणि तृतीय स्थानी कु.नीता कांबळे या होत्या.
अकरावी वाणिज्य शाखेचा निकाल गुणानुक्रमे खालील पद्धतीने प्रथम स्थानी श्री. विनायक कोळी, कु. साक्षी चौगुले द्वितीय स्थानी व पूजा हडपद तृतीय स्थानी होत्या.
अकरावी विज्ञान शाखेचा निकाल गुणानुक्रमे 'A' तुकडी खालील पद्धतीने प्रथम क्रमांक विभागून कु. सुहानी माळी आणि श्री. निशांत सोनकांबळे,द्वितीय स्थानी अभिजीत आडमुठे व तृतीय स्थानी राजेश्वरी थोरात या होत्या.
गुणानुक्रमे 'B' तुकडी खालील पद्धतीने प्रथम क्रमांक भूमिका वडर, दुसऱ्या स्थानी कु. श्रुतिका सुदडे, तृतीय स्थानी श्री. श्रेणिक कुमटाळे होत्या.
गुणानुक्रमे 'C तुकडी खालील पद्धतीने प्रथम क्रमांक कु.प्रज्ञा शिंदे द्वितीय स्थानी कु.भूमी विभूते तर तृतीय स्थानी श्री श्रेयस चौगुले उत्तीर्ण झाले आहेत.
सुरुवातीस कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा.भरत आलदर यांनी केले. प्रा.डॉ. महावीर बुरसे यांनी बारावी परीक्षा प्रक्रिया संदर्भात उत्तम सूचना व मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.सुनील चौगुले यांनी व उपस्थित सर्व घटकांचे आभार प्रा.ए.टी.ऐनापुरे यांनी मानले. ज्युनियर विभागातील अकरावी वर्ग शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
अकरावी गुणपत्रक प्रदान सोहळा व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानार्थ अकरावीच्या सर्व शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापकांनी उत्तम पद्धतीने केले. यामध्ये प्रा. विशाल बडबडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
छान
उत्तर द्याहटवा