![]() |
मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.अमर कांबळे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,डॉ.सुनील बनसोडे ,डॉ. टी.जी.घाटगे व प्रा.डॉ.एन.पी.सावंत |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यशास्त्र विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १९ एप्रिल २०२३ रोजी "डॉ. आंबेडकर यांचे लोकशाही व्यवस्थेमधील योगदान" या विषयावर प्रा.डॉ. अमर कांबळे (अण्णासाहेब डांगे कॉलेज, हातकणंगले) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व उपप्राचार्य प्रा.डॉ. सुनील बनसोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते प्रा.डॉ. अमर कांबळे मार्गदर्शन करताना म्हणाले, डॉ.आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून तमाम भारतीयांना न्याय,स्वातंत्र्य, समता व बंधुत्व याची शाश्वती दिली. त्यामुळे तमाम भारतीयांना एक माणूस म्हणून जगण्याची हमी मिळाली.
डॉ. कांबळे पुढे म्हणाले,सर्व भारतीयांना राजकीय, सामाजिक व आर्थिक अधिकार प्राप्त झाले आहेत. आज संविधानामुळे या देशातील सर्व सामान्य व्यक्ती ही राष्ट्रपती ,पंतप्रधान आणि कोणत्याही पदावर विराजमान होऊ शकते. डॉ. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी करून ठेवले आहेत त्यामुळे हे शक्य होत आहे. डॉ.आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना प्रगतीचे स्वप्न पाहण्याचे व लोकशाही मार्गाने ते सत्यात आणण्याचे एक खुला मार्ग उपलब्ध करून दिला. समाजातील उपेक्षित वंचित, मागास जाती-जमाती व अल्पसंख्याक समूहाला त्याचबरोबर स्त्रिया व लहान मुलांना या संविधानाच्या माध्यमातून एक उत्तम संरक्षण कवच प्राप्त झाले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य प्रा.डॉ.सुरज मांजरे म्हणाले, डॉ.आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना अधिकाराबरोबर जी कर्तव्य सांगितले त्याचे पालन या देशातील प्रत्येक घटकांनी तंतोतंत पद्धतीने केलं तर भारतीय लोकशाही अधिक प्रगल्भ होऊ शकते. विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानामधील विविध कलमांचा अभ्यास करून आपलं ज्ञान अधिक समृद्ध केलं पाहिजे जेणेकरून भविष्यात जीवन जगताना येणाऱ्या समस्येवर उत्तम पद्धतीने मात करता येईल असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमातील मान्यवर व विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रा.डॉ.टी.जी.घाटगे यांनी या कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. प्रा.डॉ.एन.पी.सावंत यांनी पाहुण्यांचा उत्तम परिचय करून दिला. कार्यक्रमाचे आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.डी. खळदकर यांनी मानले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील १६ प्राध्यापक व १२७ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरचा व्याख्यान पर कार्यक्रम डॉ. सुरत मांजरे यांच्या उत्तम नेतृत्वाखाली संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा