![]() |
सुटा वार्षिक कार्यकारणी बैठक व सर्वसाधरण सभा संपन्न |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन अर्थात सुटा ची कोल्हापूर जिल्हा वार्षिक कार्यकारिणी बैठक व सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळेस सुटाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर उपस्थित होते.
सुरुवातीस सुटाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. अरुण पाटील यांनी कार्यकारणी बैठक आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे स्वागत केलं. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा कार्यवाह डॉ. डी.आर.भोसले यांनी सभेची विषयी पत्रिका मांडली. त्यानंतर ३६ वा जिल्हा वार्षिक अहवाल सादर सादर करताना महत्त्वाच्या ठळक बाबी स्पष्ट केल्या. सभासदांच्या संख्येतील वाढ, कार्यक्षम प्रशासन व्यवहार, प्राध्यापक विश्वाच्या अनुषंगाने इथुंभूत माहिती, प्राध्यापक कल्याण निधी यामध्ये झालेली वाढ, प्रा.एस.जी.पाटील (बाबा) कार्य गौरव कार्यक्रमाच्या केलेले उत्तम आयोजन, नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन, मेळावे व आंदोलन याच्या माध्यमातून प्राध्यापकांचे प्रश्न ऐरणी वर मांडण्याचे काम, नवीन शैक्षणिक धोरणाविषयीक चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन, कोर्ट केसच्या संदर्भातील सर्व माहितीरुपी अहवाल सादर केला. तसेच सरते शेवटी नव्याने निर्माण झालेल्या संघटनेस पुढील आव्हाने यांना सामोरे जाण्यासाठी संघटितपणे संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. प्रश्न एकजुटीने सोडवणे यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी नैतिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
यावेळी सुटाचे खजिनदार डॉ. गजानन चव्हाण यांनी ताळेबंद पत्रक सादर केले. सर्वानुमते ते संमत करून सुटाच्या जिल्हा पदाधिकारी व सर्व कार्यकारणी सदस्यांचे आभार म्हणून जिल्हा कार्यकारणी बैठक उत्साहात पूर्ण झाली.
यानंतर ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली.डॉ.अरुण पाटील यांनी मयत झालेल्या सर्व घटकांसाठी स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. दि.२२/८/२०२२.रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले.सभेची विषय पत्रिका मांडून सर्व विषयांना सर्वांनुमते मान्यता देण्यात आली. डॉ. डी.एन.पाटील यांनी एमफुक्टो व एआयफुक्टो पातळीवरील आंदोलनाची व घडामोडी ची संगोपांग माहिती दिली. तसेच डॉ.प्रकाश कुंभार यांनी सेट-नेट कोर्ट केसविषयी उत्तम मार्गदर्शन केलं.
सुटा जिल्हा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर यांनी उद्बोधक मार्गदर्शन केले.
जुन्या व नवीन जिल्हा कार्य करण्याचे साहित्य बैठक संपन्न होऊन नव्या पदाधिकारी यांना कार्यभार सुपूर्द करण्यात आला. सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळेस जुन्या पदाधिकाऱ्यानी आपला अनुभव कथन केलं.
यानंतर नव्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. नूतन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ.रसूल कोरबु, कार्यवाह डॉ. गजानन चव्हाण व खजिनदार डॉ. विजय देसाई यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर संघटनेच्या कामाची दिशा कशी असणार आहे याबाबत भाष्य केले.
एकूणच कोल्हापूर जिल्हा सुटाची वार्षिक कार्यकारणी व वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारला.
सदर बैठकीस व सर्वसाधारण सभेस सुटा सभासद प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा