![]() |
जयसिंगपूर कॉलेजमध्ये शोभायात्रा |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : अनेकांचे एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शोभा यात्रेचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
जयसिंगपूर कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शोभा यात्रा आयोजित केली होती.
प्रारंभी एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शोभायात्रा आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.
प्रा.डॉ.एन.पी.सावंत यांनी डॉ. आंबेडकर यांचे कार्याविषयी थोडक्यात मार्गदर्शन करून शोभा यात्रेस शुभेच्छा दिल्या.
सदरची शोभायात्रा कॉलेज पासून ते मरगुबाई मंदिरापर्यंत पुढे शिरोळवाडी रोड मार्गे हनुमान मंदिरापर्यंत पुन्हा कॉलेजपर्यंत ही शोभायात्रा मार्गस्थ होती. या शोभा यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक परिवर्तनाचे वैचारिक दर्शन घडविणारे हात फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते. विद्यार्थिनींचा मोठा सहभाग होता. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या कार्याच्या व व्यक्तिमत्त्वाच्या प्रेरणादायी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
शोभायात्रेत उप प्राचार्य प्रा.डॉ.एस.बी.बनसोडे,प्रा.डॉ.सौ. मनिषा काळे,प्रा.डॉ. टी.जी.घाटगे, प्रा.डॉ.संदीप तापकिरे,प्रा.किरण पाटील,प्रा.अमर शिंदे,प्रा.कु.माधुरी कोळी, प्रा.एम.एस.बागवान, प्रा.भारत आलदर, प्रा.कुंभार, श्री संजय चावरे, प्रदीप सुतार, एनसीसी कॅडेट्स व एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या नेतृत्वाखाली एन.सी.सी. ऑफिसर प्रा. सुशांत पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.के.डी.खळदकर व प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले होते. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. टी.जी.घाटगे यांनी उत्तम पद्धतीने केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा