Breaking

शनिवार, २२ एप्रिल, २०२३

*इचलकरंजीत उष्माघाताचा पहिला बळी ; सामाजिक कार्यकर्ते रंगराव लाखे यांचा दुर्देवी मृत्यू*


सामाजिक कार्यकर्ते रंगराव लाखे


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


इचलकरंजी :  येथील लालनगर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते तथा दि कस्तुरबा गांधी (कोल्हाटी, लाखे समाज) को-ऑप. टेनंट ओनरशीप हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष रंगराव महिपती लाखे ( वय वर्ष ७१) यांचे शुक्रवारी उष्माघातामुळे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    सामाजिक कार्यकर्ते रंगराव लाखे झोपडपट्टी पुनर्वसन, संजय गांधी निराधार योजना यासह विविध सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले होते.गुरुवारी दुपारच्या सुमारास उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने ते चक्कर येऊन रस्त्यावर कोसळले. त्यामध्ये त्यांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने त्यांच्यावर कोल्हापूरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना aव नातवंडे असा परिवार आहे. वाढत्या उन्हामुळे इचलकरंजीत उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे.

        वरील पार्श्वभूमीवर जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येते की, दुपारी एक ते चार वाजेपर्यंत घरातून कामाशिवाय बाहेर पडू नये. बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी. सोबत पाण्याची बाटली, डोक्यावर टोपी किंवा पांढरे शुभ्र कापड असावे. तब्येतीची अस्वस्थता वाटल्यास जवळच्या डॉक्टराशी संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा