![]() |
जयसिंगपूर कॉलेजमध्ये ग्रंथ दिंडी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजमध्ये डॉ. आंबेडकर जयंती निमित्त भव्य-दिव्य ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, उप प्राचार्य प्रा.डॉ.एस.बी. बनसोडे,प्रा.डॉ. एन.पी सावंत,प्रा.डॉ. टी.जी.घाटगे व ग्रंथपाल अमर कुलकर्णी उपस्थित होते.
जयसिंगपूर काॅलेज व अंतर्गत दर्जा हमी कक्ष (IQAC) अंतर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गेले सप्ताहभर विविध रचनात्मक कार्यक्रम साजरे होत आहेत. यामध्ये आज शुक्रवार दि.२१ रोजी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रंथदिंडीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुरत मांजरे यांचे हस्ते झाले. याप्रसंगी ते म्हणाले, ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील तरुण पिढी अर्थात वाचनाला प्राधान्य देऊन वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ घडावी. जेणेकरून समाज परिवर्तनाच्या माध्यमातून समतावादी समाज व्यवस्था निर्माण होईल.
प्रा.डाॅ.नितीन सावंत यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. या अनुषंगाने डॉ.बाबासाहेबांचे वाचनाविषयक विचार व सामाजिक कार्य याबाबत थोडक्यात मात्र उत्तम मार्गदर्शन केले.
या ग्रंथ दिंडीचे वैशिष्ट्ये म्हणजे ग्रंथदिंडीमध्ये महाविद्यालयातील सुमारे ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्राचार्या, प्राध्यापक,विद्यार्थी पासून कॉलेजमधील शिपाई पर्यंत या ग्रंथ दिंडी सोहळायात सहभागी होऊन ग्रंथ दिंडी हाती घेतली होती. मुळात विद्यार्थिनी व महिला प्राध्यापकांनी अधिक सहभाग दर्शविला. यावेळी 'वाचाल तर वाचाल', 'शिका -संघटीत व्हा -संघर्ष करा' आणि 'जब-तक सुरज चांद रहेगा ! बाबासाहब आपका नाम रोशन रहेगा! अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ग्रंथदिंडीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व त्यांनी लिहिलेले ग्रंथ तसेच संविधान ठेवण्यात आले होते.
सदरची ग्रंथ दिंडीचे आयोजन प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या नेतृत्वाखाली उपप्राचार्य डाॅ.सुनील बनसोडे, समन्वयक व IQAC प्रमुख डॉ.तुषार घाटगे, ग्रंथपाल अमर कुलकर्णी यांनी केले.तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा