Breaking

बुधवार, १२ एप्रिल, २०२३

*विवेकवादाच्या माध्यमातून सामाजिक व वैचारिक क्रांती शक्य : रमेश(अण्णा) माणगावे*


अंनिसचे प्रमुख शिलेदार मा. रमेश माणगावे मार्गदर्शन करताना


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीच्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे 'महाराष्ट्र विवेक वाहिनी' उपक्रमांतर्गत "अंधश्रद्धा निर्मूलन व जादूचे प्रयोग" या विषयावर अंनिसचे रमेश माणगावे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ.एन.एल.कदम अध्यक्षस्थानी होते.

     अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आघाडीचे शिलेदार रमेश माणगावे मार्गदर्शन करताना म्हणाले, महाराष्ट्र विवेक वाहिनी ही कॉलेजमधील सर्व घटकांसाठी विवेकवाद विचारप्रवण करणारी व प्रत्यक्षात कृतीशील कार्यक्रम आखणारी संघटना आहे. उपस्थित विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक जाणीव निर्माण करण्यासाठी काही प्रयोगशील उपक्रम सादर केले. तसेच देश विकासासाठी विज्ञान, तर्कशक्ती व  सदसद विवेक बुद्धी व रचनात्मक कृती ची गरज असते. मा.माणगावे पुढे म्हणाले,विवेकवादाच्या माध्यमातून सामाजिक व वैचारिक क्रांती शक्य आहे.


     महाराष्ट्र विवेकवाहिनीचे समन्वयक डॉ.सौ. सुनंदा शेळके यांनी उपस्थित मान्यवर घटक व विद्यार्थ्यांचे स्वागत करून कार्यक्रम आयोजनाचा उदात्त हेतू स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, विवेक वाहिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मन,मनगट व बुद्धी ही विवेकी व विज्ञान दृष्टीत झाली पाहिजे.

      अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ.एन.एल. कदम म्हणाले, विज्ञानधिष्ठित समाज घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कटिबद्ध राहिले पाहिजे.

     प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.प्रभाकर माने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.तर या कार्यक्रमाचे आभार डॉ.के.डी. खळदकर यांनी मानले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.सौ.सुजाता पाटील यांनी केले.

       सदर कार्यक्रमासाठी.डॉ. नितीश सावंत, डॉ. टी.जी.घाटगे, डॉ.सौ.एस.जी.संसुद्धी, डॉ.तापकीर,डॉ. महावीर बुरसे,प्रा. किरण पाटील,प्रा.बाळगोंडा पाटील,डॉ.राजेंद्र कोळी, प्रा. कविता चानकने, प्रा.सुरज चौगुले,प्रा. परशुराम माने, प्रा.आर.डी.म्हामुलकर, प्रा.सौ. कल्पना पाटील,प्रा.माधुरी कोळी, प्रा.अमर शिंदे ,प्रा. महंमद बागवान, श्री. ए.बी.कांबळे व विवेक वाहिनीचे सदस्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा