![]() |
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.शरद बनसोडे,संचालक,क्रीडा विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी,बारामतीच्या जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२३ उत्साहात संपन्न झाला.यशाच्या शिखरावर जाण्यासाठी उचित धेय्य, प्रामाणिक प्रयत्न व सर्वकष व्यक्तिमत्त्वाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर क्रीडा विभागाचे संचालक प्रा.डॉ.शरद बनसोडे यांनी केले. यावेळी संस्थेचे चेअरमन व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे, सचिव, डॉ.महावीर अक्कोळे, खजिनदार मा. पद्माकर पाटील व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.
सुरुवातीस डॉ.बनसोडे यांनी महाविद्यालयातील विविध विभागाच्या उपक्रमाबाबत व केजी टू पीजी गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच त्यांनी कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या मूलभूत सोयी सुविधेबाबत समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी संस्थेचे चेअरमन डॉ.सुभाष अडदंडे ,डॉ.महावीर अक्कोळे, पद्माकर पाटील व स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संचालक प्रा.डॉ.शरद बनसोडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी उचित ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे आहे. मुळात विद्यार्थी हा शब्द विविध अर्थाने परिपूर्ण असून विद्यार्थी या शब्दाचे वैशिष्ट्ये त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नकारात्मकतेतून सकारात्मकतेचा संघर्षमय मात्र विजयी प्रवासाची उदाहरण देताना विश्वविख्यात व्हॉलीबॉलपटू निकी (niki) याचे प्रेरणा निर्माण करणारे उदाहरण दिले.
डॉ. बनसोडे पुढे म्हणाले, फियर हा शब्द दोन अर्थानी वापरला जातो.एक अर्थ जो कशाचाही विचार न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. दुसरा अर्थ मात्र फिअर या शब्दावर मात करण्यासाठी स्वतः चे करियर यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवा जेणेकरून भीती हा शब्द आपोआप संपुष्टात येतो.
डॉ. बनसोडे म्हणाले, या महाविद्यालयातील स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर पाहता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय खेळाडू निपजण्याची क्षमता आहे. त्यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून क्रीडा विभागाची वाटचाल त्या दृष्टीने असली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली.
संस्थेचे चेअरमन डॉ.सुभाष अडदंडे अध्यक्ष स्थानावर बोलताना म्हणाले, आजची तरुणाई मोबाईल मध्ये न गुंतता स्वतःचं करिअर बनविण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. संस्था व महाविद्यालया कडून विद्यार्थी घडविण्यासाठी आवश्यक मदत व सहकार्य केले जात असते. विद्यार्थ्यांनी प्रथम शिक्षणाला प्राधान्य देऊन सोबत महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर चा पर्याप्त वापर करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम व आदर्श खेळाडू म्हणून चमकावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.तसेच त्यांनी प्राप्त परिस्थिती बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी करून या निमित्ताने महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधनात्मक यशाच्या व पुढील शैक्षणिक वाटचालीबाबत संक्षिप्त अहवाल सादर केला.डॉ.एन.पी.सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
डॉ.एस.बी.बनसोडे, डॉ.एन. एल.कदम, डॉ.सौ.व्ही.व्ही.चौगुले व डॉ.एम.एस. सूर्यवंशी यांनी अनुक्रमे पारितोषिक प्राप्त व गुणवंत प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, शैक्षणिक गुणवंत विद्यार्थी पारितोषिक, सांस्कृतिक ,एनसीसी व एन.एस.एस. मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे व क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा प्रगतीचा अहवाल सादर केला.
सुरुवातीला मुंबई येथे झालेल्या SRD मध्ये राज्याचे नेतृत्व करणारी अर्थात कंपनी कमांडर कु. श्रुती यादव व सुवर्णपदक विजेता राष्ट्रीय खेळाडू श्री. तेजस जोंधळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. शरद बनसोडे यांच्या हस्ते विजयी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ.अडदंडे,डॉ. अक्कोळे व मा.पद्माकर पाटील यांच्या शुभहस्ते इतर विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आभार डॉ. संदिप तापकिरे यांनी मानले. या कार्यक्रमाचे उत्तम व सूत्रबद्ध सूत्रसंचालन प्रा. सुनिल चौगुले व प्रा.सौ.अंजना चौगुले-चावरे यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्यानी केले.
सदर कार्यक्रमास संस्थेचे सदस्य अशोक शिरगुप्पे सर, प्रा. आप्पासाहेब भगाटे, मा.शशांक इंगळे,मा.अशोक मादनाईक,डॉ. शितल पाटील, डॉ.अनिल पाटील,डॉ.धवल पाटील, मा.विपुल खाडे, मा.महावीर पाटील, प्रा.अण्णासाहेब क्वाणे व इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यालयीन अधीक्षक संजीव मगदूम, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा