*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : साकीब उर्फ महंमदहुसेन ऐनोद्दीन पाटील (वय वर्ष २५, रा. समतानगर, शिरोळ) याने इदगाह हॉल जयसिंगपूर येथे १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्न कार्यालयातील एका खोलीत नेऊन दरवाजा आतून बंद करुन तिचा हात हातात पकडून जोराने दाबून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असा आरोप ठेवून त्याच्यावर जयसिंगपूर पोलिसात भा.दं.वि.सं.क. ३५४, पोक्सो ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिरोळ मधील बेघर वसाहत परिसरातील एक मुलगी वडील, आई, भाऊ यांच्यासमवेत लग्नासाठी जयसिंगपूर येथील इदगाह हॉल येथे आले होते. यावेळी संधी साधून साकीब याने हे कृत्य केले.
दरम्यान, या घटनेची नोंद झाली असून तपास पो.स. ई. वाघ यांनी सुरु केला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल व्हावा यासाठी मध्यरात्रीपर्यंत असंख्य कार्यकर्ते जयसिंगपूर पोलिसात ठाण मांडून होते, असे समजून आले आहे. दरम्यान, संशयीताला अटक करुन प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा