बालाजी सरोज भावकाव्य समुहाचे २रे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन मा. दत्ताजी मेघे एम बी ए कॉलेज सभागृह अत्रे ले आऊट नागपूर येथे १४ मे २०२३ रोजी रविवारी संपन्न होणार आहे . या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक श्री . नारायणराव जोशी असून उद्घाटक विदर्भ अवार्ड विनर्स असोसिएशनचे श्री . सुरेश रेवतकर हे आहेत .
त्याचप्रमाणे विशेष अतिथी मान्यवर म्हणून खापरी येथील येळाहरी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते मा.सचिन इंगळे हे आहेत. विशेष अतिथी मा.प्रा.डाॅ.आबासाहेब कल्याणकर नांदेड, सुप्रसिद्ध गायक मा.गुणवंत घटवाई यांची उपस्थिती राहणार आहे.
संमेलन सकाळी ९ ते सायंकाळीं ५ या वेळात होईल . या प्रसंगी मुंबईच्या प्रा. सुनंदा पाटील यांच्या " सावली अंबराची " या गझल संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. याचे वेळी विविध प्रकारात लेखन करणाऱ्यां महाराष्ट्रातील साहित्यिकांना साहित्य पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे .
दुसऱ्या सत्रात गझल मुशायर्याचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्ष स्थानी जेष्ठ गझलकारा गझलनंदा या उपस्थित राहणार आहेत .
निमंत्रित गझलकार - पल्लवी उमरे,मंदा खंडारे,विकास गजापूरे,नारायण सुंदरसे,हृदय चक्रधर,अंजली वारकरी, सुजाता दरेकर हे आहेत.
तसेच नांदेड येथीत जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.आबासाहेब कल्याणकर यांच्या अध्यक्षते खाली निमंत्रितांचे कवि संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
निमंत्रित कवी - रक्षा चिलवेरवार, अबोल बनसोड,कुशल डरंगे,वसुधा येनकर,भूषण ठाकरे,आरती कावरे,स्मिता मोहरीर,प्रणोती शेंडे,मंदा वाघमारे,विठ्ठल घाडी,पायल भुसाटे,प्रभाकर दुर्गे,मिलिंद खोब्रागडे,शोभा खोकले,उज्वला धांडे,आकाश देशमुख,रंजना काटकर,प्रांजल रायपुरे, मंदाकिनी भावे,सोनाली देशमुख धनमने,विद्या निनावे ,धनश्री पाटील,अर्चना पिसे,नीमा बोडखे,शुभम भुरले ,भारती दवणे,सीमा भांदर्गे,छाया शहाणे,अशोक कांबळे, सुचिता कुनघटकर,प्रेरणा वाडी,प्रा.भारत झाडे,चित्रा गोतमारे, ॠचा मांजरखेडे, सुषमा साबळे इत्यादी आहेत.
याप्रसंगी शंखनाद चॅनेलच्या सौ .नीता अंजनकर ,सुत्रसंचालनक ॠचा मांजरखेडे वगरकर, आणि भारती दवणे राजापुरे,सरस्वती स्तवन सुप्रसिद्ध गायिका सौ.विद्या बोरकर करतील. आभार प्रदर्शन मा.श्रीराम चव्हाण करतील. चित्रपट सृष्टीतील मान्यवर सौ . माधुरी अशिरगडे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मानही यावेळी करण्यात येणार आहे .
या संमेलनात रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन समुहाच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सरोज अंदनकर यांनी केले आहे. .
सह आयोजक
श्रीराम सं.अंदनकर
संपर्क --सौ. सरोज अंदनकर 9307907319
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा