![]() |
प्रा.सुनंदा पाटील |
मूळ चामोर्शी येथील प्रा. सुनंदा पाटील यांना , दि. १४ मे २०२३ रविवारी नागपूर येथे होणाऱ्या २ रे राज्य स्तरीय बालाजी साहित्य मराठी साहित्य संमेलनात साहित्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे . सध्या त्या मुंबई येथे राहतात .त्यांनी लिहिलेल्या आणि लोकव्रत प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या "या वळणावर " या कथा संग्रहास सर्वोत्कृष्ट कथा संग्रहाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे . तसेच त्यांच्या " गझल प्रेमऋतूची " या गझलसंग्रहास याच समुहाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे .
याच राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात लोकव्रत प्रकाशन पुणे व्दारा प्रकाशित " सावली अंबराची " या गझल संग्रहाचे जेष्ठ साहित्यिक श्री . नारायणराव जोशी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे .
याच संमेलनात होणाऱ्या " गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष स्थान " जेष्ठ गझलकारा आणि स्व .सुरेश भट यांच्या शिष्य प्रा. सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा भूषवणार आहेत . नागपूर येथे मा . दत्ताजी मेघे सभागृह अत्रे ले आऊट येथे होणाऱ्या या संमेलनात रसिकांनी उपस्थित रहावे असे आयोजकांनी कळविले आहे.
या चौफेर यशा बद्दल सुनंदाताईंचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा