![]() |
वधू-वरांच्या हस्ते शालेय वाटप करताना |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : प्रा.सहदेव घाटगे हे स्वतः एक संवेदनशील प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या कनिष्ठ सुपुत्र चिरंजीव रोहित व सौ. वर्षा यांच्या विवाह सोहळ्याच्या दरम्यान नियोजनाप्रमाणे अक्षता रोपण झाल्यानंतर वधू-वरांच्या शुभ हस्ते त्यांनी नगरपालिका व जिल्हा परिषद शाळेतील २५ गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करून अनोख्या पद्धतीने विवाह साजरा केला. या शालेय साहित्यामध्ये दप्तर, वही,पेन, कलर सेट, कंपास पेटी व अन्य उपयोगी साहित्य याप्रसंगी असंख्य प्रतिष्ठित नागरिक व पाहुणे व मित्र परिवारांच्या उपस्थितीत हा रचनात्मक कार्यक्रम संपन्न झाला. या अनोख्या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उपस्थित यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे समाधान दिसून येत होते.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा.सहदेव घाटगे यांची पत्नी सौ. छाया व ज्येष्ठ चिरंजीव प्रा.राहुल व त्यांची पत्नी सौ. प्रणोती यांनी केले.
या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा