Breaking

रविवार, ७ मे, २०२३

*लोकराजा छत्रपती शाहू महाराजाचे कार्य सर्व स्पर्शी ; प्रा.डॉ.एन.पी.सावंत यांचे प्रतिपादन*


मार्गदर्शन करताना वक्ते प्रा.डॉ.एन.पी.सावंत, अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डॉ.सुरत मांजरे,डॉ.के.डी.खळदकर, डॉ. टी.जी.घाटगे, प्रा.भारत आलदर 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : छत्रपती शाहू महाराजेचे कार्य सर्व स्पर्शी असल्याने ते लोकराजा होते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.डॉ.एन.पी.सावंत यांनी व्यक्त केले.जयसिंगपूर कॉलेजच्या सामाजिक शास्त्र मंडळाच्या वतीने आयोजित "छत्रपती शाहू राजांचे विचार व कार्य" या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे हे होते.

      छ.शाहू शताब्दी स्मृतीपूर्ती व कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण  करण्यात आला. यानंतर मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व नियोजनाप्रमाणे कॉलेज मधील सर्व घटक सकाळी ठिक १०.०० वाजता १०० सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांच्या विचार व रचनात्मक कार्याला मनोभावे अभिवादन करण्यात आले.

    याच पार्श्वभूमीवर राज्यशास्त्र विभाग प्रमुख व प्रमुख समन्वयक डॉ.के.डी. खळदकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करून आयोजित केलेल्या व्याख्यानाचा हेतू स्पष्ट केला.

     मराठी विभाग प्रमुख प्रमुख वक्ते प्रा.डॉ.एन.पी.सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले, लोकराजा शाहू राजांनी स्वातंत्र्य,समता व बंधुत्व या त्रयीच्या आधारावर मनुष्य केंद्रबिंदू मानून आपली कारकीर्द यशस्वीपणे पूर्ण केली. शाहू राजांची तत्कालीन विरोधकांकडून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. परंतु शाहू राजाने आपले सक्षम विचार व रचनात्मक कृतीच्या माध्यमातून या सर्व घटकांना आपलंसं करून लोकशाही पद्धतीने राज्यव्यवस्था चालवली.डॉ.सावंत पुढे म्हणाले, कोल्हापूर संस्थानातील किंबहुना आसपासच्या संस्थानातील ही प्रत्येक व्यक्तीला शाहू राजे हक्काचा राजा,आपला राजा व लोकराजा असे वाटत होते. यासंदर्भात विविध पद्धतीचे माहीत नसलेली अनेक किस्से त्यांनी सांगितले. कर्मवीर अण्णा शाहू राजांच्या विचार व कृतीने प्रभावित झाले होते. यामुळेच आज प्रचंड मोठा शैक्षणिक व सामाजिक व्याप असलेली रयत शिक्षण संस्थेची निर्मिती झाली.

       प्राचार्य डॉ.सुरत मांजरे अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले, शाहू राजा हे लोक दिलाचा राजा असून त्यांनी आपलं आयुष्य समाजातील प्रत्येक घटकासाठी वेचले. खरं म्हणजे शाहू राजे एक समाजतज्ज्ञ, शेतीवर प्रचंड प्रेम करणाऱ्या शेतकरी राजा, नवीन उपक्रमाला व संशोधनाला चालना देणारे संशोधक, कृषी व उद्योगाच्या माध्यमातून अर्थकारण करणारे अर्थतज्ज्ञ, जल व जंगल या प्राथमिक क्षेत्राला प्राधान्य देऊन नाविन्यपूर्ण उपक्रम करणारा आजच्या काळातील बळीराजा होय.

       या कार्यक्रमाचे आभार डॉ.सौ. व्ही. व्ही. चौगुले यांनी मानले. तर या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.सौ.कविता चानकने यांनी केले. सदर कार्यक्रमास IQAC समन्वयक प्रा.डॉ.टी.जी.घाटगे, डॉ.सौ.एस.जी.संसुद्धी, डॉ.राजू कोळी, प्रा.सुरज चौगुले, प्रा. परशुराम माने, प्रा.कु.माधुरी कोळी व प्रा.बागवान यांचे विशेष सहकार्य लाभले.

      या कार्यक्रमास भोलू शर्मा,एन.एस.एस. स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा