Breaking

मंगळवार, १८ जुलै, २०२३

*जयसिंगपुरातील उद्योजकासह तिघांच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल*


फसवणूक


हातकणंगले : राजेंद्र मालू, अर्चना मालू (दोघे रा. गल्ली नं. ८, जयसिंगपूर), पी. डी. पुजारी (रा. इचलकरंजी), सी.बी. पाटील (रा. इचलकरंजी) या चौघांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात प्रकाशराव आप्पासाहेब पाटील (रा. गणेश मंदिरजवळ, शाहूनगर, जयसिंगपूर) यांनी फिर्याद दिली आहे. चौघांच्या विरोधात भा.दं.वि.सं.कलम १२० (ब), ४२०, ४२७, ४२१, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती विश्वजीत पाटील यांनी दिली आहे.

      विश्वजीत पाटील माहिती देताना म्हणाले, खोटे वटमुख्यार दस्त करुन त्या आधारे प्रकाशराव पाटील यांची फसवणूक झाली आहे. प्रकाशराव पाटील हे वटमुख्त्यार करतेवेळी हजर न राहता ते हजर आहेत असे भासवून खोटे वटमुख्त्यार करुन त्या आधारे गट नं. ४१, ४२/१, ४२/२. ४४, ४५ ४६ ४७ ४८, ४९, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५५, ५६, ५७, ५८, ६१,६३, ६५, ६६, ६८, ७०, ७१,७२,८१, ९१ असे २८ गटाचे क्षेत्रफळ ८ हेक्टर १२ आर जमिन खरेदी करण्याच्या हेतूने कट करून खोट्या व्यक्ती हजर करून शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन, खोटे खरेदी दस्त करून फसवले आहे, असे सांगत विश्वजीत पाटील म्हणाले, पोलीस उपअधिक्षक भोसले यांच्या आदेशाने वरील कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे आणि या घटनेचा अधिक तपास पो. स. ई. निशाणदार हे करीत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा