![]() |
महिलेची जटा निर्मूलन करताना कृष्णात स्वाती व इतर मान्यवर |
*बेळगाव मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जटा निर्मूलन*
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
बेळगांवी : अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात तरुणांनी व्यापक स्वरुपात सहभागी व्हावे. श्रध्दा असावी पण अंध नसावी. आम्ही अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अनेक बदल घडवून आणले आहेत. आगामी काळात ही चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करा, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस कृष्णा स्वाती यांनी व्यक्त केले.
रामदेव गल्लीतील गिरीष कॉम्प्लेक्समधील सभागृहात बेळगाव शाखेतर्फे आयोजित जटा निर्मूलन कार्यक्रमात ते बोलत होते. सभागृहात त्यांच्या हस्ते जटा निर्मूलन करण्यात आले. यानंतर ते बोलत होते.व्यासपीठावर समितीच्या बेळगाव शाखेचे कार्याध्यक्ष शंकर चौगुले, अॅड. नागेश सातेरी, प्रा. मिलिंद कट्टी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष रेश्मा खाडे, निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे, कृष्णा शहापूरकर, नीला आपटे होत्या.
प्रा. मयूर नागेनहट्टी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर बेळगुंदी येथील इंदुमती सुतार यांचे जटा निर्मूलन करण्यात आले. यावेळी गौरी चौगुले, अनुसया चौगुले, सुनीता बागिलगेकर, अनिता सुतार उपस्थित होत्या. यावेळी मनोहर हक्केरीकर, परशराम हदगल, हरिचंद्र सुतार,अनेक ठिकाणी जटा निर्मूलन करण्यात केले आहे. मात्र बेळगाव शहरात आज पहिल्यांदाच जटा निर्मूलन कार्यक्रम होत आहे. जटा निर्मूलन ही एक सामाजिक चळवळ व्हावी, यासाठी सर्वांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे शंकर चौगुले यांनी सांगितले.
संदीप मुतगेकर, सागर बस्तवाडकर, भरत गावडे, अनिल आजगावकर, विलास हुबळीकर, शंकर मासेकर, जे. पी. अगसीमनी, हरी आवळे, महेश ओलेकर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा